दसऱ्याच्या शुभदिनी संगमनेर तालुक्याला कोरोनाचा मोठा दिलासा.

संगमनेर Live
0
तालुक्यात आज १३ बांधीत रूग्ण. शहरी व ग्रामिण भागात बाधीताची संख्या घटली.

संगमने Live | दसऱ्याच्या शुभदिनी संगमनेर तालुक्याला मोठा दिलासा मिळाला असून रविवारी (२५ ऑक्टोबर) रोजी संगमनेर तालुक्यात आज १३ कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहे. आश्वी परिसरालातील आश्वी बुद्रुक या गावामध्ये आज पुन्हा नव्याने बाधीत रुग्ण आढळला आहे.

रविवारी सापडलेल्या कोरोना बाधीत रुग्णामध्ये संगमनेर येथे ३, संगमनेर खुर्द येथे १, आश्वी बुद्रुक येथे १, घुलेवाडी येथे १, जोर्वे येथे १, गुंजाळवाडी येथे १, कोकणगाव येथे १, कोळवाडे येथे १, जवळे कडलग येथे १, चिकणी येथे १ व डोगंरगाव येथे १ असे कोरोना बाधीत रुग्ण आढळून आल्यामुळे आज तालुक्यात १३ कोरोना बाधीत रुग्णाची भर पडली आहे.

दरम्यान आश्वी परिसरातील आश्वी बुद्रुक या गावामध्ये आज पुन्हा नव्याने बाधीत रुग्ण आढळल्याने नागरीकानी प्रशासनाच्या सुचनाचे पालन करणे आवश्यक आहे.

टिप :- उशीरा आलेली माहिती अपडेट केली जाईल.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !