थोडा वेळ लागतो पण, युटेक कारखाना दिलेला शब्द पाळतो - रवीद्रं बिरोले

संगमनेर Live
0
‘ युटेक शुगर ’ चा चतुर्थ बॉयलर अग्नी प्रदिपन सोहळा उत्साहात संपन्न.

संगमनेर Live | यावर्षी कोरोनाचे संकट व साखर गोदामाला लागलेल्या अग्नीमुळे मोठे अर्थिक नुकसान कारखाण्याला सहन करावे लागले. मागील वर्षी युटेक कारखाण्याची २ हजार १६६ रुपये एफआरपी असताना कारखाण्याने शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार २५१ रुपये वर्ग केले आहे. मागील गंळीत हंगाम सुरु होण्यापुर्वी आम्ही शेतकऱ्याना २ हजार ५११ रुपये दर देऊ असे सांगितले होते. तो शब्द युटेक कारखाना पाळणार असून या वर्षीच्या गळीत हंगाम सुरवातीलाच शेतकऱ्याची मागील उर्वरित रक्कम खात्यात वर्ग करणार आहोत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनो थोडा वेळ लागतो पण, युटेक कारखाना दिलेला शब्द पाळतो. असे प्रतिपादन युटेक कारखाण्याचे संस्थापक रवीद्रं बिरोले यानी केले आहे.

संगमनेर तालुक्यातील कौठे - मलकापूर येथे आयोजित युटेक साखर कारखाण्याच्या चतुर्थ बॉयलर अग्नी प्रदिपन सोहळ्यात उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना रवीद्रं बिरोले अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी जेष्ठ संचालक अँड. रामदास शेजुळ व सौ. बेबीताई शेजुळ याच्या हस्तें बॉयलर अग्नी प्रदिपन सोहळा विधिवत पुजा करुन संपन्न झाला. याप्रसंगी संचालिका अश्विनीताई बिरोले, नंदन बिरोले, हरिभाऊ गिते, एकनाथ नागरे, सुभाष कोळसे, सुकदेव शेटे, बँक प्रतिनिधी सुरेश शिदें, बाबाजी सागर, तान्हाजी बागुल, पाटीलबा पंचपिड, रावसाहेब मगर, डॉ. कैलास डोगंरे, बापु धुळगड, माजिद फारुकी, भाऊसाहेब मंडलिक, अजित गुळवे, गोरक्ष डहाळे आदिसह ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बिरोले पुढे म्हणाले की, मागील वर्षीचा गंळीत हंगाम अत्यंत खडतर होता. कारखाना सुरु केल्यास नुकसान होणार होते. हे माहित असून ही केवळ शेतकरी हितासाठी ते नुकसान सहन करण्याची तयारी युटेक ने ठेवून मागील गळीत हंगाम सुरु केला. परंतू तोडणी यंत्रणे अभावी कारखाना लवकर बंद करावा लागला.   तर कोरानाच्या संकटामुळे कारखाण्याला मोठा त्रास सहन करावा लागला आहे. यावर मात करत कारखाण्याने यावर्षी पुन्हा १ नोव्हेंबर पासून युटेकच्या गंळीत हंगामाला सुरवात होणार असून ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, वाहतूकदार यांनी विश्वास ठेवून सहकार्य करावे असे आवाहन करुन मागील वर्षी कारखानदाराची परिक्षा होती तर यावर्षी शेतकऱ्यांची परिक्षा असल्याने ऊस कोणाला द्याचा याचा योग्य निर्णय शेतकऱ्यांनी घ्यावा असे रवीद्रं बिरोले शेवटी म्हणाले आहेत.

दरम्यान यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी सुकदेव शेटे यांनी केले आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !