विवाहितेला सासरच्या मंडळीकडून जिवे मारण्याची धमकी.

संगमनेर Live
0
◻ मोबाईल घेतला काढून ; आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

संगमनेर Live | नाशिक येथे वास्तव्यास असलेले परंतू हल्ली संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे राहत असलेल्या महिलेच्या चारित्र्यावर शितोंडे उडवत तिला जिवे मारण्याची धमकी दिल्याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे.

दाखल केलेल्या तक्रांरीत महिलेने म्हटले आहे की, नाशिक येथे मी, माझे पती, सासु, सासरे व ननंद असे राहत असून घरात अनेक दिवसापासून लहान मोठ्या कारणातून सतत वाद सुरु होते. त्यामुळे मी माहेरी आले होते. त्यानतंर माझ्या सासरकडची मंडळी घरी आली व त्यानी मोबाईल मधील जुने फोटो दाखवून आमची सुन वागण्यात बरी नसल्याचे माझ्या नातेवाईकाना सांगितले. यावेळी माझी बदनामी करण्याच्या हेतूने अतिशय वाईट गोष्टी सांगण्यात आल्या. यावेळी माझे पती स्वप्निल सापनर, सासरे प्रकाश सापनर, सासु संगिता सापनर (तिन्ही रा. नाशिक), गोरक्षनाथ सापनर, चुलत सासु पज्ञा सापनर (रा. मुंबई) व चुलत सासरे भागवत सापनर, चागदेव सापनर (रा. नाशिक) यानी मला शिविगाळ करुन नादंण्यास आल्यास गळा दाबून मारण्याची धमकी दिली. तर पती स्वप्निल सापनर याने नादंवणार नसल्याची धमकी दिली. यावेळी गावात माझे निवडक फोटो दाखवून बदनामी करण्यात आली आल्याचे म्हटले आहे. 

दरम्यान आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा रंजिस्टर नबंर ४१३/२०२० प्रमाणे भादंवी कलम १४३, १४७, १४८, ५००, ५०४, ५०६ व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरिक्षक सुधाकर मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !