◻ तालुक्यात आज २६ बांधीत रूग्णाची भर. शहरी भागालाही दिलासा तर जोर्वेत रुग्णसंख्या वाढली.
संगमने Live | शनिवारी (२४ ऑक्टोबर) रोजी संगमनेर तालुक्याला दिलासा मिळाला असून आज २६ कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहे. आश्वी परिसरालातील रहिमपूर या गावामध्ये आज पुन्हा नव्याने बाधीत रुग्ण आढळला आहे.
शनिवारी सापडलेल्या कोरोना बाधीत रुग्णामध्ये संगमनेर येथे २, सारोळे पठार येथे १, वरुडी पठार येथे १, जोर्वे येथे १२, कोकणगाव येथे १, रहिमपूर येथे १, घुलेवाडी येथे २, राजापूर येथे ३, तळेगाव येथे १, चंदनापूरी येथे १ व निमोण येथे १ असे कोरोना बाधीत रुग्ण आढळून आल्यामुळे आज तालुक्यात २६ कोरोना बाधीत रुग्णाची भर पडली आहे.
दरम्यान आश्वी परिसरातील रहिमपूर या गावामध्ये आज पुन्हा नव्याने बाधीत रुग्ण आढळल्याने नागरीकानी प्रशासनाच्या सुचनाचे पालन करणे आवश्यक आहे.
टिप :- उशीरा आलेली माहिती अपडेट केली जाईल.