◻ माजी पंचायत समिती सभापतीसह आठ जणाना घेतला चावा.
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील हंगेवाडी, शेडगाव, शिबलापूर व माळेवाडी परिसरात तरस सदृष्य प्राण्याने धुमाकूळ घालत हंगेवाडी व शेडगाव परिसरातील माजी पंचायत समिती सभापतीसह तब्बल आठ ते दहा जणाना चावा घेत गंभीर जखमी केल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शनिवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास हंगेवाडी येथिल माजी पंचायत समिती सभापती अंकुशराव कांगणे, मिराबाई सांगळे, अनुसया सांगळे याना तरस सदृष्य प्राण्याने चावा घेऊन जखमी केले.
तर शेडगाव येथील कैलास सांगळे, निता सांगळे, शंकर सांगळे, भिका फड, मारुती नागरे यांना ही तरस सदृष्य प्राण्याने गंभीर चावा घेऊन जखमी केले. तर या सर्व जखमीना तातडीने संगमनेर येथिल सरकारी रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती पंचायत समिती सदंस्य निवृत्ती सांगळे यांनी दिली आहे. तर पानोडी येथिल प्रियंका कराड व शिबलापूर येथिल बबन मुन्तोडे या दोघानवर ही या प्राण्याने हल्ला केल्याची माहिती मिळाली.
दरम्यान हंगेवाडी, शेडगाव, शिबलापूर, पानोडी परिसरात तरस सदृष्य प्राण्याने धुमाकूळ घातल्यामुळे मोठी दहशत निर्माण झाली असून नागरीकानी खबरदारी घेऊन योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन सांगळे यांनी केले आहे. तर हा प्राणी तरस आहे की लाडंगा याबाबत खुलासा झाला नसला तरी शिबलापूर व पानोडी शिवेलगत पाढरदरा परिसरात नागरीकानी या प्राण्याला बंदोबस्त केल्याची माहिती मिळाली आहे.