◻ ग्रामिण भागाची आकडेवारी वाढली.
संगमने Live | शुक्रवारी (२३ ऑक्टोबर) रोजी संगमनेर तालुक्यात ३३ कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले असून आश्वी परिसरालातील आश्वी खुर्द, रहिमपूर व मनोली या गावामध्ये आज पुन्हा नव्याने बाधीत रुग्ण आढळले आहेत.
शुक्रवारी सापडलेल्या कोरोना बाधीत रुग्णामध्ये संगमनेर येथे ६, आश्वी खुर्द येथे १, रहिमपूर येथे ३, मनोली येथे १, जोर्वे येथे १२, कोकणगाव येथे १, ढोलेवाडी येथे १, पिपळगाव कोझिंरा येथे १, निमगाव टेभीं येथे १, समनापूर येथे २, कसार दुमला येथे १, रहाणे मळा, गुंजाळवाडी येथे १, पेमगिरी येथे १, सारोळे पठार येथे १ असे कोरोना बाधीत रुग्ण आढळून आल्यामुळे आज तालुक्यात तब्बल ३३ कोरोना बाधीत रुग्णाची भर पडली आहे.
दरम्यान आश्वी परिसरातील आश्वी खुर्द, रहिमपूर व मनोली या गावामध्ये आज पुन्हा नव्याने बाधीत रुग्ण आढळल्याने नागरीकानी प्रशासनाच्या सुचनाचे पालन करणे आवश्यक आहे.
टिप :- उशीरा आलेली माहिती अपडेट केली जाईल.