संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील कौठे मलकापुर येथे उभ्या राहिलेल्या युटेक शुगर लिमिटेड या तालुक्यातील पहिल्या खाजगी साखर कारखान्याचा चतुर्थ २०२० -२१ गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदिपन संमारभं उद्या दि. २५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वा. युटेकचे संस्थापक रवीद्रं बिरोले यांच्या प्रमुख उपस्थितीत व कारखाण्याचे संचालक अँड. रामदास शेजुळ व सौ. बेबीताई शेजुळ यांच्या हस्तें कारखाना कार्यस्थळावर आयोजित करण्यात आला आहे.
सन २०१९ - २० या वर्षी दुष्काळी परिस्थिती असताना ऊस उत्पादक शेतकरी, वाहतुकदार, ऊस पुरवठादारांनी मोलाची साथ दिल्याने मागील गळीत हंगाम व्यवस्थित पार पडला. मागील वर्षाची कारखान्याची एफआरपी २ हजार १६६ रुपये असतान कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहीला हफ्ता २ हजार २५१ रुपये इतका बॅक खात्यात वर्ग केला होता. तर उर्वरीत रक्कम ही लवकरचं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. अशी माहिती कारखान्याकडून देण्यात आली.
दरम्यान २०२० - २१ या गळीत हंगामासाठी ऊस उत्पादक, पुरवठादार, कामगार व वाहतुकदार यानी सहकार्य करावे व उद्या होणाऱ्या बॉयलर अग्नी प्रदिपन संमारभं प्रसंगी परिसरातील तसेच जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यानी शासकीय नियमाचे पालन करत उपस्थित राहावे, असे आवाहन कारखाण्याचे संचालक मंडळ तसेच प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
जास्तीत जास्त ऊस गाळपाचे उद्धिष्टे..
मागील तीन गंळीत हंगाम यशंस्वी करुन युटेक शुगरने शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचा मोबदला देण्याचे काम केले आहे. यावर्षी श्री गजानन महाराज यांच्या कृपाशिर्वादाने चांगला पाऊस झाल्याने ऊस मोठ्या प्रमाणात गळीतास उपलब्ध असून कारखाण्याकडे ऊसाची नोदंणी झालेली आहे. त्यामुळे कारखाण्याने जास्तीत जास्त ऊस गाळप करण्याचे उद्धिष्टे डोळ्यासमोर ठेवलेले असून कारखाण्याच्या माध्यमातून येथिल शेतकरी, शेती व गावे विकासाच्या माध्यमातून समृध्द करण्याच्या दृष्टिकोणातून पावले उचलण्यास आम्ही सुरवात केली असल्याची माहिती युटेक शुगर लि. संस्थापक अध्यक्ष रविद्रं बिरोले यांनी संगमनेर Live शी बोलताना दिली आहे.