◻ शहरात २ बांधीत रूग्ण तर आश्वी परिसरात पुन्हा रुग्ण संख्खा वाढली.
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील नागरीकानी शासकीय नियमाचे पालन व खबरदारी घेतल्याने संगमनेर Live परिवार आपल्या जिद्दीला सलाम करत असून आज सोमवारी (२६ ऑक्टोबर) रोजी संगमनेर तालुक्यात आज पुन्हा अवघे १३ कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे संगमनेरकराना कोरोनाचा धोका आद्यापही टळलेला नाही. आश्वी परिसरालातील आश्वी बुद्रुक व मनोली या गावामध्ये आज पुन्हा नव्याने बाधीत रुग्ण आढळले आहेत.
सोमवारी सापडलेल्या कोरोना बाधीत रुग्णामध्ये संगमनेर येथे २, आश्वी बुद्रुक येथे १, मनोली येथे ३, घुलेवाडी येथे १, गुंजाळवाडी येथे ३, निमगाव बुद्रुक येथे १, वरवंडी पठार येथे १, खांडगाव येथे १ असे कोरोना बाधीत रुग्ण आढळून आल्यामुळे आज तालुक्यात १३ कोरोना बाधीत रुग्णाची भर पडली आहे.
दरम्यान आश्वी परिसरातील आश्वी बुद्रुक व मनोली या गावामध्ये आज पुन्हा नव्याने बाधीत रुग्ण आढळल्याने नागरीकानी प्रशासनाच्या सुचनाचे पालन केल्यास संगमनेरकर लवकरचं कोरोनाला हद्दपार करतील यात आता कोणालाही शंका नाही.
टिप :- उशीरा आलेली माहिती अपडेट केली जाईल.