जय जगदंबा क्रिकेट क्लबच्यावतीने भव्य टेनिस बॉल स्पर्धेचे आयोजन.
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील ओझर बुद्रुक येथे गुरुवारी सकाळी जय जगदंबा क्रिकेट क्लबच्यावतीने भव्य टेनिस बॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.
स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी लक्ष्मन खेमनर, गबाजी खेमनर, अनिल नागरे, रावसाहेब फड (मुंबई पोलीस), बाळु वने (मुंबई पोलीस), संदिप नागरे (मुंबई पोलीस), महेश नागरे, ललित मोरे, सचिन कांगणे, पत्रकार भाऊसाहेब फड आदिसह खेळाडू आणि क्रिडा रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
******
दरम्यान या स्पर्धेत पंचक्रोशीतील संघानी शासकीय नियमाचे पालण करत सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकानी केले आहे.