संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर शिवारातील दत्त मंदिरालगत मंगळवारी सायंकाळी ८.३० वाजेच्या सुमारास ऊस तोडणी मजुंराव बिबट्याने हल्ला केला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पद्मश्री विखे पाटील कारखाण्याचा ऊस तोडणी मजुंर सचिन मदन राठोड (वय - २२) हा तरुण आपल्या दुचाकीवरुन आश्वी कडे येत होता. यावेळी प्रतापपूर शिवारातील दत्त मंदिरालगत शिकारीच्या शोधात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने या तरुणावर हल्ला केला. यावेळी या तरुनाबरोबर असलेल्या दोघानी मोठा आरडा ओरड केल्यामुळे बिबट्या आंधारात निघून गेला. तर बिबट्याच्या हल्यात या तरुणाच्या पायाला जखम झाल्यामुळे स्थानिक नागरीकाच्या सहकार्याने आश्वी आरोग्य केद्रांत त्याला प्राथमिक उपचारासाठी दाखल केले होते.
दरम्यान आनंद मेडिकलचे मालक राजेद्रं लुनिया याना या घटनेची माहिती मिळताचं तात्काळ त्यानी या तरुणाला मोफत लस उपलब्ध करुन दिली. तर विकास भागवत गायकवाड व गौरव मुन्तोडे यांनी या तरुणाची मदत केली आहे.