◻ आश्वी पंचक्रोशीत दुचाकी चोरीचे सत्र वाढले.
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर शिवारातून १९ डिसेंबर रोजी मध्यरात्री चोरट्यानी दुचाकी चोरुन नेल्याची फिर्याद आश्वी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून मागील काही दिवसापासून आश्वीसह पंचक्रोशीतील गावातून दुचाकी चोरी जाण्याचे प्रमाण वाढल्याने पोलीस प्रशासनाने या चोरट्याने जेरबंद करावे अशी मागणी होऊ लागली आहे.
शेळके यानी दाखल केलेल्या तक्रांरीत म्हटले आहे की, १९ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२ हजार रुपये किमंतीची बजाज कंपनीची सीटी १०० (एम एच १७ एएच ३९६४) ही अज्ञात चोरट्यानी चोरुन नेल्यामुळे गुरंव नं - ४५७/२०२० नुसार भादंवी कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर याच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार भाग्यवान हे करत आहे.