◻ शिर्डी मतदार संघातील १४, अकोलेतील २१ तर तालुक्यातील इतर ५९ ग्रामपंचायतीचा समावेश.
◻निवडणूकीनतंर सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत ; घोडेबाजार रोखण्यासाठी सरकारचा ‘ मास्टरस्ट्रोक ’
संगमनेर Live | कोविड - १९ च्या जागतिक संकटामुळे २०२० मध्ये रखडलेल्या राज्यातील १४ हजार ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचा मुहुर्त अखेर महाविकास अघाडी सरकारला मिळाला असून जानेवारी २०२१ मध्ये प्रत्यक्षात मतदान होणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये संगमनेर तालुक्यातील ९४ ग्रामपंचायतीचा समावेश असल्याने या गावात प्रचाराचा राजकीय धुराळा उडणार आहे. तर सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत निवडणूकीनतंर होणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यानी दिल्याने प्रस्थापित गाव पुढाऱ्यापुढे ‘ इकडे आड अन तिकडे विहीर ’ असे चित्र उभे ठाकले आहे.
संगमनेर तालुक्यातील १४३ ग्रामपंचायतीपैकी ९४ ग्रामपंचायतीची २०२० मध्ये मुदत संपली होती. परंतु जगावर आलेल्या कोरोना संकटामुळे जानेवारी २०२१ मध्ये या निवडणूका होत असून यामध्ये तालुक्यातील ५९, शिर्डी मतदार संघातील १४ व अकोले मतदार संघातील २१ ग्रामपंचायतीचा समावेश असल्याने कॉग्रेसचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व लोकसभेच्या निवडणूकीवेळी भाजपवासी झालेल आ. राधाकृष्ण विखे पाटील ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराच्या निमत्ताने आमने-सामने येणार असल्याने या दोन दिग्गज नेत्याची राजकीय प्रचाराची कुस्ती मतदाराना नेहमीप्रमाणे पाहण्यास मिळणार आहे.
निवडणूकीसाठी सज्ज झालेल्या संगमनेर तालुक्यातील ९४ ग्रामपंचायती पुढील प्रमाणे..
संगमनेर विधानसभा मतदार संघात येत असलेल्या निमोण, वडगावपान, घुलेवाडी व धादंरफळ व संगमनेर खुर्द जिल्हापरिषद गटातील संगमनेर खुर्द, चंदनापूरी, झोळे, कोचीं मांची, माळेगाव हवेली, सुकेवाडी, सावरगाव तळ, शिदोंडी, वडगावपान, मालदाड, सोनूशी, देवकौठे, कौठे मलकापूर, हिवरगाव पठार, खरशिंदे, शेडेवाडी, वरंवडी, मेढंवन, कौठे कमळेश्वर, खांजापूर, कऱ्हे, पारेगाव खुर्द, लोहारे, पळसखेडे, सोनेवाडी, वेल्हाळे, जवळे कडलग, कासार दुमला, राजापूर, निमगाव बुद्रुक, निमगाव खुर्द, पेमगिरी, खांडगाव, जाखुरी देवगाव, हिवरगाव पावसा, रायतेवाडी कुरण, समनापुर, तिगाव, कोकणगाव, खांबे, मिरपूर, पिपंळे, देवकौठे, पारेगाव बुद्रुक, कासारे, चिखली, मंगळापूर, वडगांव लांडगा, शिरसगाव धुपे सावरगाव चोळ, सागवी, कौठे धादंरफळ, मिर्झापूर, नादुंरी दुमाला, डिग्रंस, रायते निमगाव टेभीं व शिरपूर या ५९ ग्रामपंचायतीचा समावेश आहे.
शिर्डी विधानसभा मतदार संघात येत असलेल्या कनोली, पिप्रीं लौकी अजमपूर, चिचंपूर, चणेगाव, झरेकाठी, पानोडी, प्रतापपूर, शेडगाव, ओझर बुद्रुक, औरंगपूर, खळी, दाढ खुर्द, शिबलापूर, मनोली या १४ ग्रामपंचायतीचा समावेश असून या ठिकाणी ना. थोरात व आ. विखे पाटील याच्या गटामध्ये सत्तावर्चस्वाची अटीतटीची पहावयास मिळणार आहे. त्यामुळे या १४ गावानमध्ये थेट कॉग्रेस विरुद्ध भाजप अशीचं लढत पाहण्यास मिळणार आहे.
अकोले विधानसभा मतदार संघात येत असलेल्या अकलापूर, बोटा, पिपळगाव माथा, खंदरमाळवाडी, नादुंर खंदारमाळ, पिपळगाव देपा, कौठे बुद्रुक, भोजदरी, माळेगाव पठार, म्हसवंडी, कुरकुंडी, आबी खालसा, कौठे खुर्द, आंबी दुमाला, कुरकुटवाडी, वनकुटे, पोखरी बाळेश्वर, वरुडी पठार, सावरगाव घुले, जवळे बाळेश्वर व महालवाडी या २१ ग्रामपंचायतीचा समावेश आहे.
दरम्यान संगमनेर तालुक्यातील ८३ ग्रामपंचायतीवर महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात गटाचे तर शिर्डी मतदार संघात येत असलेल्या १४ ग्रामपंचायतीपैकी ११ ग्रामपंचायतीवर आ. विखे पाटील गटाचे वर्चस्व असून ९ जिल्हापरिषद गटामध्ये राजकीय डावपेचाना वेग आला आहे. तसेचं संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी निवडणूक असलेल्या गावानमधील ग्रामसेवक व तलाठी यांना प्रभाग निहाय मतदान याद्या तयार करण्याच्या सुचना दिल्या असल्याची माहिती मिळाली आहे. तर यदां निवडणूकीनतंर सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत काढली जाणार असल्याने सरपंच पदासाठी प्रस्थापित गावपुढाऱ्याची मक्तेदारी व घोडेबाजार रोखण्यासाठी सरकारने ‘ मास्टरस्ट्रोक ’ मारल्यामुळे मतदारामध्ये आनंदाचे वातावरण आहे.