शिर्डी विधासभा मतदार संघ व संगमनेर तालुक्यातील १४ गावात ८३.८२ टक्के मतदान.

संगमनेर Live
0
४९ प्रभागातील १३८ जागासाठी २८१ उमेदवाराचे भवितव्य मतपेटीत बंद.

संगमनेर Live | संगमनेर तालुक्याती ९४ ग्रामपंचायतीपैकी ४ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने प्रत्यक्षात ९० ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये संगमनेर तालुक्यातील व शिर्डी मतदार संघातील १४ गावानमध्ये विक्रमी ८३.८२ टक्के मतदान झाले असून ४९ प्रभागातील १३८ जागासाठी २८१ उमेदवाराचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. यावेळी काही गावानमध्ये किरकोळ बाचाबाची वगळता सर्वत्र शांततेत व उत्साही वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली.

चिचंपूर येथे ५ प्रभागात एकून ८८.४३ टक्के मतदान झाले असून ३,४५६ मतदारापैकी ३,०५६ मतदारानी मतदानाचा हक्क बजावला. प्रतापपूर येथे ३ प्रभागात एकून ८८.७१ टक्के मतदान झाले असून १,४७९ मतदारापैकी १,३१२ मतदारानी मतदानाचा हक्क बजावला. औरंगपूर येथे ३ प्रभागात एकून ९३.३६ टक्के मतदान झाले असून ८४३ मतदारापैकी ७८७ मतदारानी मतदानाचा हक्क बजावला. पिप्रींलौक अजमपूर येथे ४ प्रभागात एकून ८४.३० टक्के मतदान झाले असून २,७२० मतदारापैकी २,२९३ मतदारानी मतदानाचा हक्क बजावला आहे. 

पानोडी येथे ४ प्रभागात एकून ८२.३८ टक्के मतदान झाले असून २७८७ मतदारापैकी २२९६ मतदारानी मतदानाचा हक्क बजावला. शिबलापूर येथे ४ प्रभागात एकून ८१.१६ टक्के मतदान झाले असून २,३७२ मतदारापैकी १,९२५ मतदारानी मतदानाचा हक्क बजावला. चणेगाव येथे ३ प्रभागात एकून ७८.६३ टक्के मतदान झाले असून २,०३६ मतदारापैकी १,६०१ मतदारानी मतदानाचा हक्क बजावला. दाढ खुर्द येथे ३ प्रभागात एकून ९०.२७ टक्के मतदान झाले असून १,८०८ मतदारापैकी १,६३२ मतदारानी मतदानाचा हक्क बजावला. खळी येथे ३ प्रभागात एकून ६०.१७ टक्के मतदान झाले असून २,२४२ मतदारापैकी १,३४९ मतदारानी मतदानाचा हक्क बजावला आहे. 

झरेकाठी येथे ३ प्रभागात एकून ८५.९५ टक्के मतदान झाले असून १,७२३ मतदारापैकी १४८१ मतदारानी मतदानाचा हक्क बजावला. शेडगाव येथे ३ प्रभागात एकून ८३.३२ टक्के मतदान झाले असून १,९९१ मतदारापैकी १,६५९ मतदारानी मतदानाचा हक्क बजावला. ओझर बुद्रुक येथे ३ प्रभागात एकून ९४.४२ टक्के मतदान झाले असून १,००३ मतदारापैकी ९४७ मतदारानी मतदानाचा हक्क बजावला. कनोली येथे ४ प्रभागात एकून ८५.२८ टक्के मतदान झाले असून २,८६१ मतदारापैकी २,४४० मतदारानी मतदानाचा हक्क बजावला. मनोली येथे ४ प्रभागात एकून ८९.०९ टक्के मतदान झाले असून २,३०९ मतदारापैकी २,०५७ मतदारानी मतदानाचा हक्क बजावला आहे. तर १४ गावातील एकून २९,६३० मतदारापैकी २४,८३५ मतदारानी प्रत्यक्षात मतदान केल्याने विक्रमी ८३.८२ टक्के मतदान झाले आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात व भाजपचे जेष नेते व आमदार राधाकृष्ण विखे पाटील या दोन बलाढ्य नेत्याची व स्थानिक कार्यकर्त्याची प्रतिष्ठा ग्रामपंचायत निवडणूकीच्या निमित्ताने पणाला लागली असून यावेळी प्रत्येक गावात ना. थोरात विरूद्ध आ. विखे या दोन गटातील कार्यकर्त्यानमध्ये मतदान घडवून आणण्यासाठी मोठी चुरस पहायला मिळाली. यामुळे सोमवार १८ जानेवारी रोजी होणाऱ्या आश्वी व जोर्वे या दोन्ही जिल्हापरिषद गटातील १४ गावाच्या मतमोजणी व निवडणूक निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

दरम्यान आश्वी पोलीस स्टेशन अतर्गत येणाऱ्या १८ ग्रामपंयतीसाठी मतदान प्रकीया शांततेत पार पडली असून कोठेही अनुचित प्रकार घडु नये यासाठी आश्वीचे पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर, नियत्रंण कक्षाचे पोलीस निरीक्षक वसंत पचवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नयन पाटील, नियत्रंण कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू थोरात यांच्यासह ४८ पोलीस कर्मचारी व २७ होमगार्ड यानी चोख बंदोबस्त ठेवत ६० बुधच्या माध्यमातून मतदान प्रकीया सुरळीत पार पाडली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !