◻ जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र प्रदान.
संगमनेर Live | राष्ट्रवादी कॉग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते व संगमनेर पंचायत समितीचे माजी विरोधीपक्ष नेते उंबरी बाळापूर येथिल सरुनाथ सुखदेव उंबरकर यांची जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके व जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे यानी उंबरकर याना नियुक्तीपत्र प्रदान केले आहे.
राष्ट्रवादी कॉग्रेसची बुलदं तोफ तसेच सर्वसामान्याच्या न्याय हक्कासाठी भल्या भल्याना भिडणारे कार्यकर्ते म्हणून सरूनाथ उंबरकर हे जिल्ह्याला परिचित आहेत. संगमनेर पंचायत समितीचे विरोधीपक्ष नेते असताना त्यानी आपल्या कामाचा मोठा ठसा उमटवला होता. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा व जेष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील, ना. दिलिप वळसे पाटील याच्याशी थेट संपर्क तसेच सर्वसामान्यात मिसळणारे व्यक्तीमत्व अशी ओळख त्यानी निर्माण केली आहे.
उंबरकर यानी १९९९ साली राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष, संगमनेरचे १० वर्ष तालुका कार्याध्यक्ष, संगमनेर पंचायत समितीचे सदंस्य व विरोधीपक्ष नेते, वडगावपान टोलनाका संघर्ष समिती आदि ठिकाणी आपल्या कामाचा ठसा उमटवताना संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील विविध रस्ते, वीज तसेच जायकवाडी पाणी आदि आदोंलनात सक्रीय सहभाग नोदंवला आहे.
पक्ष संघटना वाढवण्याबरोबरोबर कार्यकर्त्याना ताकत देण्याचे काम करणार असून महाविकास आघाडी सरकारच्या योजना तळागाळातील नागरीकाना मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे. अगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत पक्षाला जास्तीत जास्त यश मिळवून देण्याबरोबरचं पक्षाच्या सच्चा कार्यकर्त्याला न्याय देऊ अशी प्रतिक्रिया निवडीनतंर सरुनाथ उंबरकर यानी दिली असून आगामी जिल्हापरिषद निवडणूक लढवणार असल्याचे संकेत यावेळी दिले आहेत.