प्रतापपूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दत्तात्रय आंधळे तर उपसरपंच पदी सौ. संगिता आव्हाड.

संगमनेर Live
0
जेष्ठ कार्यकर्ते भगवानराव इलग याच्यांंकडून नुतन पदाधिकारी व सदंस्याचा संत्कार.

संगमनेर Live | संगमनेर तालुका तसेच शिर्डी मतदार संघातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या प्रतापपूर ग्रामपंचायतीत भाजपचे जेष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील याच्या मार्गदर्शनाखाली व जेष्ठ कार्यकर्ते भगवानराव इलग याच्या नेतृत्वात घवघवीत यश संपादन केले असून नुकतेच ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दत्तात्रय आंधळे व उप सरपंचपदी सौ. संगिता आव्हाड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

मंगळवारी झालेल्या सरपंच व उपसरपंच निवडीप्रसंगी जेष्ठ कार्यकर्ते भगवानराव इलग, जेष्ठ सदंस्य पांडुरंग आंधळे, पोलीस पाटील विठ्ठलराव आंधळे, नुतन सरपंच दत्तात्रय बाळकृष्ण आंधळे, नुतन उपसरपंच सौ. संगिता गजानन आव्हाड, ग्रापंचायत सदंस्य अनिता अजय आंधळे, शोभा भास्कंर आंधळे, विमल भास्कर सांगळे आदि उपस्थित होते. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सातपुते व शेख यानी काम पाहिले. तर ग्रामसेवक कर्डक, तलाठी देशमुख आदि उपस्थित होते. 

प्रतापपूर येथिल मतदारानी आमच्यावर विश्वास दाखवून विखे गटाला एकहाती सत्ता मिळून दिल्यामुळे गावाबरोबरचं गावातील शेवटच्या घटकापर्यत जेष्ठाच्या मार्गदर्शनाखाली विकासकामे पोहचवणार असल्याचा विश्वास नुतन पदाधिकारी व सदंस्यानी यावेळी व्यक्त केला आहे.

दरम्यान सरपंच व उपसरपंचपदी निवडीनतंर भाजपचे जेष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हापरिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील, प्रवरा मेडिकल ट्रस्टचे प्रमुख राजेद्रं विखे पाटील, जेष्ठ कार्यकर्ते भगवानराव इलग, जिल्हापरिषद सदंस्या अँड. रोहिनीताई निघुते, शिवाजीराव इलग तसेच जनसेवा मंडळाच्या जेष्ठ व तरुण कार्यकर्त्यासह ग्रामस्थानी नुतन पदाधिकाऱ्याचे अभिनंदन केले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !