◻ राहाता तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींचायतीत सरपंच तर १५ उपसरपंच पदावर महिलांना संधी.
संगमनेर Live | राहाता तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदावर आणि १५ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदावर महिलांना विराजमान होण्याची संधी मिळाल्याने तालुक्यात ग्रामीण विकासामध्ये महिलाराज आपले वर्चस्व सिध्द करणार आहेत. भाजपाचे जेष्ठे नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नव्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ग्रामीण विकासाचे नवे पर्व सुरु होईल. निवडणूकीत २४ ग्रामपंचायतींवर विखे गटाने आपले वर्चस्व कायम राखले आहे.
नुकत्याच संपन्न झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपाचे जेष्ठनेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतींमध्ये निवडूण आलेल्या सदस्यांमधुन सरपंच, उपसरपंच निवडण्यासाठी निवडणूक कार्यक्रम संपन्न जाहीर करण्यात आला होता. यामध्ये १३ ग्रामपंचायतींवर महिलांना सरपंच होण्याची संधी मिळाली असून, उपसरपंच पदावरही १५ महिला निवडूण आल्याने तालुक्यात ग्रामीण विकासात महिलाराज पुन्हा एकदा सिध्द झाले आहे.
सर्व नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंचांचे भाजपाचे जेष्ठनेते आ. राधाकृष्ण विखे पाटील, माजीमंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील,यांच्यासह विविध संस्थाच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
सर्व नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच पदावर विराजमान झालेल्या पदाधिकाऱ्यांना आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुभेच्छा दिल्या असून, गावाच्या विकासासाठी संघटीतपणे काम करा, सर्वांच्या सहकार्यानेच विकासाचे नवे पर्व आपण साकार करु अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.