निवडणूक झाली की मतभेद विसरून एकत्र येणे ही संगमनेरची संस्कृती - महसूलमंत्री ना. थोरात

संगमनेर Live
0
यशोधन कार्यालयात नवीन सरपंच, उपसरपंच यांचा संत्कार.

संगमनेर Live | लोकशाहीमध्ये निवडणुका ह्या अनिवार्य असून निवडणूक झाली की सर्व मतभेद विसरून गावाच्या विकासासाठी एकत्र येणे ही तालुक्याची संस्कृती राहिली आहे. नवीन पदाधिकाऱ्यांनी पक्षभेद - मतभेद न करता सर्वांना बरोबर घेत गावाचा विकास साधावा असे आवाहन राज्याचे महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

संगमनेर येथिल यशोधन संपर्क कार्यालयात तालुक्यातील नवीन सरपंच, उपसरपंच व पदाधिकाऱ्यांचा एकत्रित संत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी संगमनेर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीमधील सरपंच, उपसरपंच यांचा महसूल मंत्री नामदार थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी नामदार थोरात म्हणाले की, संगमनेर तालुका हा एक परिवार आहे. या तालुक्याने राजकारणाची आदर्श संस्कृती निर्माण केली आहे. संगमनेरची ही वैभवशाली परंपरा इतरांनाही दिशादर्शक ठरली आहे. भारतामध्ये लोकशाहीप्रणाली असून लोकशाहीमध्ये निवडणुका अनिवार्य आहेत. ग्रामपंचायती,लोकसभा यामध्ये वेगवेगळ्या निवडणुका सातत्याने होत असतात. परंतु निवडणुकांमध्ये मनभेद कधीही होऊ देऊ नका. संगमनेर तालुक्यात तर आपण वेगळी संस्कृती निर्माण केली आहे. निवडणुका झाल्या की सर्व मतभेद विसरून गावच्या विकासासाठी एकत्र येत असतो. हीच परंपरा सर्वांनी जोपायची आहे. गावचे नेतृत्व करताना सर्वांना सोबत घ्या. शासकीय योजना प्रभावीपणे राबवताना जन माणसांपर्यंत पोहचविण्याचे काम करा. 

शासकीय योजनांच्या पाठपुराव्यासाठी आपण कायम प्रत्येकाच्या पाठीशी उभे आहोत. संगमनेर तालुका विकासातून पुढे जात असून सहकार, शिक्षण, ग्रामीण अर्थव्यवस्था यामुळे तालुका हे विकासाचे मॉडेल ठरला आहे. त्याचे अनुकरण अनेक ठिकाणी होत आहे. आता यामध्ये अधिकाधिक काम करताना विकासातून वैभवाकडे जाताना प्रत्येक गाव हे आदर्श होईल यासाठी ही प्रत्येकाने काम करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !