शिवभक्तं पूंजाआईच्या पूण्यतिथी सोहळ्याचे उद्या आश्वी खुर्द येथे आयोजन.

संगमनेर Live
0

२७ व्या पुण्यतिथी सोहळ्याला पंचक्रोशीतील भाविकाना उपस्थित राहण्याचे आवाहन.

संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथिल ग्रामस्थांचे श्रध्दांस्थान असलेल्या बालब्रम्हचारी शिवभक्त पूंजाआई यांच्या २७ व्या पुण्यतिथीचे उद्या गुरुवार ११ फेब्रुवारी रोजी पूंजाआई मंदिर प्रागंणात आयोजन करण्यात आले आहे.


******

पुजांआईने गोदावरी नदीकिनारी असलेल्या शिवमंदीरात १२ वर्ष तपश्चर्या केली होती. त्याचे जन्मगाव पुनतगाव (ता. नेवासे) असले तरी आश्वी खुर्द गाव हेच त्याची कर्मभूमी म्हणून ओळखले जाते. पुजांआईने गावात महादेव, मारुती व खंडोबा मंदीराच्या जिर्णोध्दारासाठी महत्त्वाचे योगदान दिले. पुजांआईने आश्वी खुर्द गावामध्ये भक्तीची सुरवात केली, परंतू कधीही अधंश्रध्देला खतपाणी घातले नाही. देवगडचे मठाधीपती भास्कंरगिरी महाराज हे पुजांआईला आपली आई मानत होते. आश्वी खुर्द प्रमाणेचं पुजाईचे देवगड व बकुपिंपळगाव येथे भव्य मंदिर असून या तीनही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पुजांआईची पुण्यतिथी साजरी केली जाते. यावेळी उपस्थित भाविकाना आमटी भाकरीच्या महाप्रसादाचे वाटप केले जाते.

दरम्यान आश्वी खुर्द येथे गुरुवारी दुपारी ४.३० वा पारंपारीक पध्दतीने सवाद्यं पुंजाआई मातेची मिरवणूक काढली जाणार असून सायंकाळी ६ वा. हभंप बाळकृष्ण महाराज कांबळे यांचे सुश्राव्य अमृतुल्य हरी किर्तन व महाप्रसादाचे वाटप होणार आहे. या पुण्यतिथी सोहळ्यासाठी आश्वीसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आश्वी खुर्द ग्रामस्थांनी केले आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !