◻आश्वी येथे भाजपच्या ‘ टाळे ठोको ' आंदोलनाला मोठा प्रतिसाद ; कार्यकर्त्याकडून आघाडी सरकारचा निषेध.
संगमनेर Live | वीज पुरवठा खंडीत करण्याचा निर्णय त्वरीत मागे घ्यावा या मागणीसाठी भाजपाचे जेष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज शुक्रवार रोजी संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथे वीज कंपनीच्या विरोधात पुकारलेल्या ‘टाळे ठोको’ आंदोलनात भाजपचे जेष्ठ व तरुण कार्यकर्त्यासह विज ग्राहक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी आदोंलकाचे निवेदन विज कंपनीचे कनिष्ठ अभियंते के. एस. भदाने व वाय. डी. सोनवणे यानी स्विकारले आहे.
आश्वी येथे झालेल्या आदोंलनप्रसंगी राज्यातील ७२ लाख वीज जोडण्यांचा वीज पुरवठा खंडीत करण्याच्या आघाडी सरकारच्या जुलमी निर्णयाला विरोध करत घोषणाबाजी करुन विरोध आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हापरिषद सदंस्या अँड. रोहिनीताई निघुते, आर. डी. कदम, डॉ. दिनकर गायकवाड, निवृत्ती सांगळे, जेऊरभाई शेख, माधवराव भोसले, हरिभाऊ ताजणे, रामभाऊ भुसाळ, भागवत उंबरकर, सरपंच म्हाळू गायकवाड, उपसरपंच सुनील मांढरे, मकरंद गुणे, बाळासाहेब मांढरे, बापुसाहेब गायकवाड, भाऊ गायकवाड, ज्ञानेश्वर वाकचौरे, विजय गायकवाड, संतोष भडकवाड आदिसह भाजपचे पंचक्रोशीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आश्वी गटाच्या जिल्हापरिषद सदंस्या अँड. रोहिनीताई निघुते म्हणाल्या की, कोरोना काळात जनतेला वीज बिल माफीचे आश्वासन देणारे सरकार आता सक्तीने वीज बिल वसूली करून जनतेला नाहक त्रास देत आहे. थकीत बिल भरले नाही तर वीज पुरवठा खंडीत करण्याची धमकी देणारे सरकार हे जनतेप्रती असंवेदनशील असल्याचा घनाघात निघुते यानी करुन आम्ही आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या आघाडी सरकारला मनमानी कारभार करू देणार नसल्याचे सांगून सरकारने लवकरात लवकर निर्णय मागे घ्यावा अशी मागणी त्यानी केली.
मागील भाजप सरकारच्या काळात कधीच शेतकऱ्यांना वीज बिल भरण्याची सक्ती केली नाही. भारनियमनाचा त्रास सहन करावा लागला नाही. उलट वीज ग्राहकांना दिलासा देण्याची भूमिका घेतली होती. थकबाकी वाढली तरी तो अर्थिक भार राज्य सरकारने स्वत:वर घेतला. कृषी क्षेत्रासाठी साडेसात लाख नवीन वीज जोडण्या दिल्या. वीज कंपन्यांची परिस्थिती सुध्दा चांगली होती. परंतू हे तिघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतरचं वीज वितरण कंपन्यांची परीस्थीती बिघडली कशी.? असा सवाल भाजपच्या जेष्ठ कार्यकर्त्यानी आदोंलनप्रसंगी उपस्थित केला आहे.
तर कोरोना प्रसारापूर्वी आघाडी सरकारच्या ऊर्जामंत्र्यांनीच १०० युनिट पर्यंत मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते प्रत्यक्षात आले नसल्यामुळे या आंदोलनाच्या माध्यमातून १०० युनिट पर्यंत मोफत विज देण्याची मागणी उपस्थित आदोंलकानी केली. दरम्यान यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये व आदोंलन शांतपणे व्हावे यासाठी आश्वी पोलीसाचा फौजफाटा आदोंलन स्थळी उपस्थित होता.