◻ शुक्रवारी पहाटेची घटना, एका विरुद्ध गुन्हा दाखल ; आरोपी गाडीसह फरार.
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर परिसरात वाळू तस्कंरानी धुमाकूळ घातला असून शुक्रवारी पहाटे अंगणात झोपलेल्या माय - लेकरावर तस्करांने वाळू वाहतूक करणारी गाडी घालून जखमी केले आहे. त्यामुळे आरोपी अनिल उर्फ बाळू नागरे याच्या विरुद्ध आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत जखमी महिलेने दाखल केलेल्या तक्रांरीत म्हटले आहे की, शूक्रवार दि. २८ मे रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास मी व माझा ४ वर्षाचा मुलगा आगणांत झोपलेलो होतो. यावेळी वाळू वाहतूक करणारी पाढऱ्या रंगाची झेनाँन गाडी (नंबर माहित नाही) जोरात आली व माझ्या तसेच मुलाच्या अंगावरुन गेली. त्यामुळे माझ्या कानाला गंभीर दुखापत झाली. तर गाडीची दोन्ही चाके पायावरुन गेल्यामुळे पायालाही दुखापत झाली असून शेजारी झोपलेल्या मुलालाही दुखापत होऊन त्याच्या तोडातील एक दात तुटला आहे.
यावेळी आम्ही मोठ्याने ओरडल्याने गाडी पुढे जाऊन घरासमोरील पलंगाला धडकली. मोठा आवाज झाल्याने भाया, जाव, दिर व सासु बाहेर आले व त्यानी गाडीकडे धाव घेतली. यावेळी अनिल उर्फ बाळू नागरे हा गाडी चालवताना नजरेस पडला. त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला परंतू तो गाडीसह तेथून पळून गेला. त्यानंतर मी व मुलगा जखमी असल्याने आम्हाला कुटुंबियानी उपचारासाठी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात नेले होते. त्यामुळे आश्वी पोलीस ठाण्यात आरोपी अनिल उर्फ बाळू नागरे (रा. प्रतापपूर, ता. संगमनेर) याच्या विरुद्ध गुन्हा रंजिस्टर नंबर ९०/२०२१ नुसार भादंवी कलम २७९, ३३७, ३३८, एमव्हीअ १८४, १३४ (अ), (ब), १७७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तर या गुन्ह्यचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुंधाकर मांडवकर याच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एस. एस. पवार हे करत असून आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
प्रतापपूर नदी पात्रात वाळू तस्कारानी धुडगुस घातला असून रात्री - अपरात्री नदीपात्रालगत असलेल्या शेतातील उभ्या पिकात वाहणे घालून वाळू चोरी केली जाते. त्यामुळे या शेतकऱ्याचे मोठे नुकसान होत आहे. परंतू निर्ढावलेली महसूल यंत्रणा वाळू तस्कंरीला आळा घालण्यासाठी कोणत्याही उपाययोजना करताना दिसत नाही. गावातील काही जण या वाळू तस्कंरीत सहभागी असून स्थानिक अधिकारी कोणतीही कारवाई करत नसल्याने येथिल स्थानिक नागरीकानी नाराजी व्यक्त करुन येथील वाळू तस्कंरी मोडीत काढावी अशी मागणी केली आहे. अन्यथा हे निर्ढावलेले वाळू तस्कंर नागरीकाचे बळी घेतली अशी भिती व्यक्त करत आहेत.