◻ कोरोनाची तिसरी लाट येण्याआधी उपाययोजनाच्या पुर्वतयारीची पाहणी.
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील निमगावजाळी आरोग्य केद्रं व माचीहिल येथिल कोविड सेटंरला गुरुवारी संगमनेरचे प्रातांधिकारी डॉ. शशिकांत मंगळुरे व गटविकास अधिकारी सुरेश शिदें यानी भेट देऊन उपाययोजनाचा आढावा घेतला आहे.
कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने या लाटेआधी निमगावजाळी आरोग्य केद्रांअतर्गत उपाययोजनाची पुर्वतयारी कशी सुरु आहे हे पाहण्यासाठी गुरुवारी प्रातांधिकारी डॉ. शशिकांत मंगळुरे व गटविकास अधिकारी सुरेश शिदें आले होते. यावेळी त्यांनी सविस्तर माहिती जाणून घेतली. याप्रसंगी चाचण्या व लसीकरण वाढवण्याच्या सूचना करुन बाधीत व्यक्ती व संपर्कातील व्यक्तीचे विलगिकरनाबाबत मार्गदर्शन केले.
प्रातांधिकारी व गटविकास अधिकाऱ्यानी मांचीहिल येथिल अश्विन ग्रामीण रुग्णालय येथे सुरु असलेल्या कोविड सेटंरला भेट देऊन रुग्ण व उपाययोजनाबाबत चर्चा केली. तिसरी लाट येण्यापूर्वी पुर्वतयारी म्हणून येथे ५० आँक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने तयारीचा आढावा त्यानी घेतला आहे. यावेळी प्रातांधिकारी डॉ. शशिकांत मंगळुरे, गटविकास अधिकारी सुरेश शिदें, डॉ. तय्यब तांबोळी, देवेंद्र चद्रशेखर, दिपक महाजन, भाऊसाहेब कानवडे, वैशाली ठुबे, विष्णु गर्जे, भास्कर गिरी, सविता शिरसाठ तसेच माची येथिल डॉक्टर व आरोग्य सेवक उपस्थित होते.