मांचीहिल कोविड केअर सेंटरला व्हेंटिलेटर व ऑक्सिजन कॉन्सट्रेटर भेट.

संगमनेर Live
0
◻ उपमुख्यमंत्री ना. अजित पवाराकडून मांचीहिल येथिल कोविड सेटंरच्या कामाचे कौतुक.

संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील मांचीहिल येथील एकलव्य मागासवर्गीय सेवाभावी संस्थेच्या अश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाच्या वतीने सुरु असेलेल्या कोविड केअर सेंटर राज्यावर आलेल्या कोरोना संकट काळात सर्वसामान्य नागरीकाना आधार देत असल्यामुळे या रुग्णालयाचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यानी कौतुक करुन डॉ. शैलेद्रसिंह होडगर याच्याकडून रुग्णालयाची माहिती जाणून घेतली आहे. लंडन येथिल डॉ. अरविंद शाह व मुकुल माधव फांऊडेशन व्दारा आर. सी. शाह संगमनेर यांचे वतीने नुकतेच ४ व्हेंटीलेटर्स व १ ऑक्सीजन कॉन्सट्रेटर ही वैद्यकीय उपकरणे भेट देण्यात आली आहेत. यावेळी संगमनेर येथील शाह बंधू व संस्थेचे संस्थापक अँड. शाळीग्राम होडगर उपस्थित होते.

अश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाने मागील वर्षीही कोविड - १९ च्या परिस्थितीत सुरु होते. याही वर्षी महाराष्ट्र शासनाने हे रुग्णालय कोविड केअर सेंटरसाठी अधिग्रहीत केलेले असून आतापर्यंत हजारो रुग्णांनी याठिकाणी उपचार घेत कोरोनावर यशस्वी मात केलेली आहे. बाधीत रुग्णांना याठिकाणी कोरोना उपचाराबरोबरच उच्चप्रशिक्षित डॉक्टरांचे मार्गदर्शन, योगा प्रशिक्षण, पौष्टिक आहार व आयुर्वेदीक काढे मोफत दिले जातात. संस्थेचे संस्थापक अँड. शाळीग्राम होडगर याच्यावतीने रुग्णांना दररोज अंडी, फळे व दुध याचे मोफत वाटप करण्यात येते. याचा परिणाम म्हणून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. सद्यस्थितीत कोरोनाची भयावह परिस्थीती पाहाता मांचीहिल कोविड केअर सेंटरला व्हेंटीलेटर्स व ऑक्सीजन कॉन्सट्रेटर मशिन भेट मिळाल्याने आश्वी सह पंचक्रोशीतील बाधीत रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

गुरुवारी प्राताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे व गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांनी मांचीहिल येथिल कोविड सेंटरला भेट देवून भविष्यात याठिकाणी ५० ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोणातून चाचपणी व आढावा घेतला आहे. त्यामुळे तिसरी लाट येण्यापूर्वी रुग्णालयाने पुर्व तयारी म्हणून पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या कामगिरीची दखल थेट राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यानी घेतल्यामुळे संस्थेच्या सेवाभावी कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दरम्यान यावेळी शाह बंधूचे स्वागत व आभार मांचीहिल शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अँड. शाळीग्राम होडगर यांनी मानले. याप्रसंगी संस्थेचे लेखापाल राजू बोंद्रे, संस्थेचे संचालक अण्णासाहेब बलमे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शिवपाल खंडीझोड, रुग्णालयाचे समन्वयक दत्ता शिंदे, महाविद्यालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ग्रामीण भागात ऑक्सिजन व्हेटिलेटरची सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल डॉ. अरविंद पी. शाह व मुकुल माधव फांऊडेशनचे आर. सी. शाह यांचे आश्वी पंचक्रोशीसह संगमनेर तालुक्यातुन कौतुक होत आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !