शेतकर्‍यांनासाठी आता ऑनलाईन पीक कर्ज सुविधा.

संगमनेर Live
0
◻ जिल्हा अग्रणी बॅक आणि एनआयसीचा पुढाकार; जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांची संकल्पना.

संगमनेर Live (अहमदनगर:) | कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. अशा परिस्थिती मध्ये शेतकरी शेतात काम करीत आहे. ह्या साथरोगामध्ये शेतकरी बँकेत जाऊन पीक कर्ज घेऊ शकत नाही. यावर उपाय म्हणून जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एनआयसी) तसेच जिल्हा अग्रणी बँक, अहमदनगर (सेंट्रल बँक ऑफ इंडिया) यांच्या माध्यमातून सर्व शेतकरी वर्गासाठी ऑनलाइन पीक कर्जासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्याची माहिती जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक संदीप वालावलकर यांनी दिली आहे.
 
या ऑनलाईन पीक कर्ज सुविधेचा लाभ घेण्यासाठी https://ahmednagar.nic.in/notice/application-for-crop-loan-2021-22-ahmednagar-district/ या लिंकवर खरीप पीक कर्जासाठी अर्ज करावयाचा आहे. या लिंकला अर्ज केल्यानंतर आपण दिलेल्या बँक शाखेकडून संबंधित अर्जदार शेतकर्‍यांना फोन करुन पुढील कार्यवाही करण्यात येईल. त्यासाठी सद्यस्थितीमध्ये बॅकेत जाण्याची आवश्यकता नसल्याचे श्री. वालावलकर यांनी कळविले आहे.

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !