◻ धान्याची गोणी फोडली म्हणून जाब विचालेल्या महिलेला जातीवाचक शिविगाळ व जीवे मारण्याची धमकी.
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील पिंप्री - लौकी अजमपुर येथे धान्याचे पोते ढकलुन दिल्यामुळे जाब विचारायला गेलेल्या महिलेला जातीवाचक शिविगाळ व अपमान करुन थेट फाशी देऊन मारण्याची धमकी दिल्यामुळे आश्वी पोलीस ठाण्यात २४ जणाविरुध्द अँट्राँसिटी कायद्याअतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रांरीत म्हटले आहे की, माझ्या घरासमोर मोठ्याभाऊ गणपत लावरे याने सुमारे एक वर्षापुर्वी पत्र्याचे शेड बांधले होते. दि. १४ मे रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास या शेडला मोठ्याभाऊ लावरे व त्याचे नातेवाईक असलेले भास्कर लावरे, गणेश लावरे, किरण लावरे, राजु लावरे, नामदेव लावरे, संपत लावरे, शंकर लावरे, भिमा लावरे, सोपान लावरे, भागदत लावरे, प्रदिप लावरे, विठ्ठल लावरे, बबन लावरे, दिलीप लावरे, जालिंदर लावरे, मनोहर लावरे, साहेबराव लावरे, संपत लावरे, दामु लावरे, लहानु लावरे, पाराजी लावरे, भिमा लावरे, बाबुराव लावरे हे शेडला चारही बाजुने जाळी लावत होते.
यावेळी त्यानी आमच्या घरासमोरील धान्याचे पोते ढकलुन दिल्यामुळे धान्याची गोणी फुटल्याने माझ्या पत्नीने त्यांना विचारणा केली असता या सर्वानी पत्नीला जिवे मारण्याची धमकी देऊन मोठ्याभाऊ लावरे, बबन लावरे व भागवत लावरे या तिघानी ढकलुन दिले. त्यामुळे ती घरासमोरील लोखंडी पलंगावर पडली व तिच्या हातातील बांगड्या फुटल्या आहेत. यानतंर मोठ्याभाऊ लावरे, बबन लावरे, भागवत लावरे व नामदेव लावरे या चौघानी माझ्या पत्नीला जातीवाचक बोलुन तिचा अपमान केला व यांना फाशी देवुन मारु असे म्हणत माझ्या सुनाना शिवीगाळ केली. तसेच माझा मुलाची सायकल ही ढकलुन दिली. याप्रसंगी विजय कदम, भास्कर गिते, योसेफ कदम, कारभारी दातीर, संजय लावरे हे उपस्थित असल्याने त्यानी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी शेडची जाळी लावण्यात आली व जाळी काढून घेण्याचे कबुल करण्यात आले होते. मात्र आजपर्यत त्यांनी जाळी काढली नसल्याचे तक्रांरीत म्हटले आहे.
दरम्यान आश्वी पोलीस ठाणे येथे गुरंव नं - ६७/२०२१ प्रमाणे भादंवी कलम १४३, १४७, १४९, ३२३, ५०४,५०६, ३४ व अनुसूचित जाती जमाती ३(१) (आर)(एस) नुसार १) भास्कर शंकर लावरे, २) गणेश शंकर लावरे, ३) किरण बाबुराव लावरे ४) राजु बाबुराव लावरे, ५) नामदेव दादा लावरे, ६) संपत नामदेव लावरे, ७) शंकर दादा लावरे ८) भिमा दादा लावरे, ९) सोपान नामदेव लावरे, १०) भागवत गंगा लावरे, ११) प्रदिप भागवत लावरे, १२) विठ्ठल गणपत लायरे, १३) बबन गणपत लावरे, १४) दिलीप बबन लावरे, १५) जालिंदर बबन लावरे, १६) मनोहर मोठ्याभाऊ लापरे, १७ ) साहेबराव बादशहा लावरे, १८) संपत साहेबराव लावरे १९) दामु दादा लापरे, २०) लहानु बादशहा लावरे, २१) पाराजी बादशहा लावरे, २२) भिमा दादा लावरे, २३) बाबुराव बादशहा लावरे २४) मोठ्याभाऊ गणपत लावरे (सर्व रा. पिप्री - लौकी अजमपुर, ता. संगमनेर) यांचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने हे करत आहेत.