चौधरवाडी शिवारातून टाँवरच्या ३५ हजाराच्या अँल्युमिनीयम तारेची चोरी.

संगमनेर Live
0
◻ चोरट्याकडून शेतकऱ्याच्या २ लाखाच्या फळबागाचे नुकसान ; आता दाद मागायची कोणाकडे.?

संगमनेर Live | तालुक्यातील चौधरवाडी शिवारात १५ ते १६ मे दरम्यान ३५ हजार रुपये किमतीची अँल्युमिनीयमची तार चोरुन नेल्याची घटना घडल्यामुळे आश्वी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द तक्रांर दाखल करण्यात आली असून तार चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यानी शेतकरी बेबीताई वर्पे याच्या शेतातील ५० सिताफळाच्या झाडाचे मोठे नुकसान केल्यामुळे या शेतकऱ्याचे मोठे अर्थिक नुकसान झाले आहे.

विभासकुमार महतो यानी दाखल केलेल्या तक्रांरीत म्हटले आहे की, चौधरवाडी शिवारातील टॉवर क्रंमाक १०२ ते १०४ ची ६४० चौरस एम. एम. जाडीची अँल्युमिनीयम तारे १५ ते १६ मे दरम्यान अज्ञात चोरट्यानी चोरुन नेली असून चोरी गेलेल्या तारेची किमंत ३५ हजार असल्याचे म्हटले आहे. यावेळी तेथील इलेक्ट्रॉनिक वस्तूचे ही नुकसान केल्याचे दाखल तक्रांरीत म्हटले आहे. त्यामुळे गुरंव नं - ७०/२०२१ प्रमाणे भादंवी कलम ३७९, ४२७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर याच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शिदें करत आहेत.

दरम्यान अँल्युमिनीयम तार चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यानी येथिल शेतकरी बेबीताई वर्पे याच्या गट नं - ८५/१ या शेतातील चार वर्ष वय असलेल्या ५० सिताफळाच्या झाडाचे मोठे नुकसान केले आहे. वार्षिक दिड ते दोन हजार उत्पन्न देणाऱ्या झाडाचे नुकसान झाल्याने या शेतकऱ्याचे अंदाजे २ लाख रुपये नुकसान झाले असून त्याची भरपाई कोणाकडे मागायची असा पेच आता या शेतकऱ्यापुढे उभा राहिला आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !