◻ रस्त्यावर विनामास्क व विनाकारण फिरणाऱ्याची अँटीजन चाचणी.
संगमनेर Live | अहमदनगरचे जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक यानी दिलेल्या आदेशानुसार आश्वी पोलीस स्टेशनचे पोलिस निरिक्षक सुधाकर मांडवकर व त्याचे सर्व सहकारी सोमवारी अँक्शन मोडमध्ये पहावयास मिळाले.
सोमवारी सकाळीचं आश्वी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आश्वी बुद्रुक, आश्वी खुर्द येथे रस्त्यावर विनामास्क व विनाकारण फिरणाऱ्या १३ नागरीकाना पोलिसांनी फैलावर घेत रँपिड अँटीजन चाचण्या केल्या आहेत. सुदैवाने यात कोणीही बाधीत आढळून आले नसून कोरोनाचा संसर्ग पाहता कोणीही विनाकारन घराबाहेर पडू नये. असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी पोलिस निरिक्षक सुधाकर मांडवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नयन पाटील, सहाय्यक फौजदार तात्याराव वाघमारे, हवालदार विनोद गंभिरे, सोनवणे, काळे तसेच होमगार्ड उपस्थित होते.
दरम्यान संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या ९६ नागरीकाची रँपिड टेस्ट करण्यात आली. यामध्ये ४ नागरीक बाधीत आढळून आले असून त्यांना कॉटेज हॉस्पिटल संगमनेर येथे विलगीकरण कक्षात ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.