थोरात कारखान्याचा रविवारी गळीत हंगाम सांगता समारंभ.

संगमनेर Live
0
संगमनेर Live | देशातील सहकारासाठी मापदंड ठरणार्‍या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचा सन २०२०-२१ या गळीत हंगामाचा सांगता समारंभ रविवार दिनांक १६ मे रोजी सकाळी ९ वा. राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. कांचनताई थोरात यांच्या हस्ते विधीवत पूजेने होणार असून यावेळी विधान परिषद सदस्य आमदार डॉ. सुधीर तांबे ,ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर यांच्या उपस्थितीत राहणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ यांनी दिली आहे

राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणार्‍या या कारखान्याने अनेक अडचणीवर मात करीत हा हंगाम यशस्वी केला आहे .यावर्षी कोरोनाचे संकट ,जास्त ऊसाचा प्रश्न, अतिवृष्टीचे संकट, साखरेचे कमी झालेले भाव अशा विविध अडचणीवर मात करत हंगाम अत्यंत यशस्वी करून आपला लौकिक कायम ठेवला आहे. या कारखान्याने नुकताच १३ लाख १३ हजार मेट्रिक टन गाळपाचा उच्चांक केला असून येत्या रविवारी (१६ मे ) या यशस्वी हंगामाची सांगता कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व शासकीय नियम पाळून होणार आहे.

कारखान्याचे सर्व सन्माननीय सभासद, ऊस उत्पादक, अमृत उद्योग समूहातील व तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, तरुण मित्र, महिला भगिनी, तालुक्यातील सर्व कार्यकर्ते , हितचिंतक, कार्य क्षेत्राबाहेरील ऊस उत्पादक या सर्वांच्या शुभेच्छा कायम कारखान्याच्या सोबत असून सर्वांनी कोरोणाचे नियम पाळावे, घरी सुरक्षित राहावे, याचबरोबर आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे, सर्व संचालक मंडळ व कार्यकारी संचालक जगन्नाथ घूगरकर यांनी केले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !