उंबरी बाळापूर येथे कोविड - १९ चाचणी शिबिराचे आयोजन.

संगमनेर Live
0
गुरुवारी ११८ नागरीकाची चाचणी ; ८ कोरोना बाधीत आढळले.

संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथे मागील काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात कोरोना बाधीत रुग्ण आढळून येत असल्याने कोरोनाला हद्दपार करण्यासाठी गुरुवारी गावात कोविड - १९ चाचणी शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी ११८ नागरीकाची कोराना चाचणी करण्यात आली असून यामध्ये ८ जनाना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले आहेत.

दिवसेंदिवस उंबरी बाळापूर येथे कोरोना बाधीताची संख्या वाढत असल्याने बुधवारी संगमनेरचे प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगळुरे, गटविकास अधिकारी सुरेश शिदें यानी भेट देऊन संशयित नागरीकाची चाचणी व विलगीकरण कक्ष निर्माण करण्याच्या सुचना केल्या होत्या. यावेळी डॉ. तय्यब तांबोळी, पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर, रामभाऊ भुसाळ, विलास उंबरकर, सरपंच किरण भुसाळ, उपसरपंच नानासाहेब उंबरकर आदि उपस्थित होते.

दरम्यान गुरुवारी निमगावजाळी आरोग्य केद्रांचे प्रमुख डॉ. तय्यब तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत उंबरी बाळापूर तर्फे प्रवरा माध्यमिक विद्यालयाच्या प्रागंणात कोरोना चाचणी शिबराचे आयोजन करुन ११८ नागरीकाची चाचणी केली असता ८ जण कोरोना बाधीत आढळून आले आहेत. यावेळी डॉ. चंद्रशेखर, डॉ. रेश्मा शेख, महेश भुसाळ, आशा सेविका सुजाता भुसाळ, पुनम शेळके, कामगार तलाठी संजय शितोळे, पोलीस पाटील वैशाली मैड, सरपंच किरण भुसाळ, उपसरपंच नानासाहेब उंबरकर, अनिल भुसाळ, सामाजिक कार्यकर्ते अशोक भुसाळ, रवीद्रं शेळके, विजय शेळके, भगवान मैड, विवेक डोखे, ग्रामपंचायत कर्मचारी सुभाष बर्डे आदिनी विशेष परिश्रम घेतले असून नागरीकानी स्वंत: पुढे येऊन तपासणी करुन घ्यावी व योग्य तो औषध उपचार घेऊन कुटुंब व गावाचे या संसर्गजन्य आजारापासून सरंक्षण करावे असे आवाहन केले आहे.

नागरीकाच्या हलगर्जीपणामुळे उंबरी बाळापूर येथे कोविड - १९ चा संसर्ग वाढला असून ग्रामस्थानी न घाबरता पुढे येऊन चाचण्या व औषध उपचार घेतल्यास पुढील काही दिवसामध्ये गावातून कोरोना हद्दपार होण्यास मदत होणार आहे. तसेच दोन ते तीन दिवसानी पुन्हा उंबरी बाळापूर येथे चाचणी शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. यावेळी राहिलेल्या नागरीकानी चाचणी करुन सहकार्य करावे.

डॉ. तय्यब तांबोळी, आरोग्य अधिकारी
प्राथमिक आरोग्य केद्रं निमगावजाळी
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !