भिमाशंकर सांगळे यांच्या निधनाने शेडगावसह घोगरगाव पंचक्रोशीत शोककळा.

संगमनेर Live
0
संगमनेर Live | नेवासे तालुक्यातील घोगरगाव येथील सामाजिक धार्मिक क्षेत्रात कार्यरत असलेले माजी सरपंच व चेअरमन तसेच सेवानिवृत्त पोलिस अधिकारी भिमाशंकर बाबुराव सांगळे (वय ७२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले असून त्याच्या निधनामुळे शेडगावसह (ता. संगमनेर) घोगरगाव (ता. नेवासे) पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.

भिमाशंकर सांगळे हे शेडगाव येथील मुळ रहिवासी असून राजकीय, सामाजिक क्षेत्रात मोठे काम त्यांनी केली आहे. त्याच्या पश्चात पत्नी, चार भाऊ, भावजया, दोन मुले, सुना, मुलगी, पुतणे व नांतवंडे असा मोठा परिवार आहे. शेडगाव येथील रहीवाशी व संगमनेर पंचायत सामितीचे सदस्य निवृत्ती पाटील सांगळे, आश्वीनी पतस्थेचे चेअरमन मेजर संपतराव सांगळे यांचे ते बंधु होते. तर मांचीहिल शैक्षणिक संकुलाचे जनसंपर्क आधिकारी बाळासाहेब सांगळे तसेच विजय सांगळे यांचे ते वडील होते. त्याच्या निधनामुळे शेडगावसह घोगरगाव पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !