◻ मांची येथिल कोविड सेंटरला दिले १ हजार लीटर शुध्द पिण्याचे पाणी.
संगमनेर Live | कोरोनाचे जागतीक संकट आता गावागावात येऊन पोहचले असून संगमनेर तालुक्यासह आश्वी पंचक्रोशीतील गावानमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना बाधीत रुग्ण आढळून येत असून मांचीहिल येथे दोनशे रुग्णानसाठी कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. या कोविड सेंटरला मदतीचा हात मिळावा म्हणून ओझर बुद्रुक येथिल जगदंबा क्रिकेट क्लबच्या तरुणानी सुत्य उपक्रम राबवत कोविड सेंटरला १ हजार लीटर शुध्द पिण्याचे पाणी दिल्यामुळे या तरुणाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
निमगावजाळी आरोग्य केंद्राअतर्गत मांचीहिल येथिल अश्विन ग्रामीण रुग्णालयात दोनशे रुग्णानसाठी कोविड सेंटर उभारण्यात आले असून येथे १२५ रुग्णावर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यत दिड हजार रुग्ण यशस्वीरित्या कोरोनावर मात करुन घरी परतले असून यामध्ये वृध्द व लहान मुलाचाही समावेश आहे. तसेच निस्वार्थ भावनेतुन येथील डॉक्टर, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, कर्मचारी काम करत असल्याने त्याचे ही कौतुक होत आहे.
या कोविड सेंटरला मदतीचा हात मिळावा या सामाजिक भावनेतून ओझर बुद्रुक येथिल जगदंबा क्रिकेट क्लबच्या विजय सांगळे, रावसाहेब फड, बाळासाहेब वने, महेश फड, संदीप नागरे, ललित मोरे, सूरेश खुळे, ध्वनित शिंदे, गणेश डोंगरे, नानासाहेब सांगळे, युवराज गुंजाळ, भाऊसाहेब कांगणे, रोहीदास कांगणे, बंडू सांगळे, आलम पठाण, असलम पठाण, लहानु शेपाळ, गणपत गंवादे, वैभव सांगळे, केतन वने, अजय नागरे या तरुणानी सुत्य उपक्रम राबवत कोविड सेंटरला १ हजार लीटर शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देत समाजातील इतर नागरीकानी शक्य ती मदत करण्याचे आवाहन या तरुणानी केले आहे.