◻ जिल्हापरिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी व आ. जिल्हा आरोग्य अधिकारी यांची निमगावजाळी येथे भेट.
संगमनेर Live | कोविड - १९ च्या संकट काळात मागील सव्वा वर्षापासून अहोरात्र निमगावजाळी येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. तय्यब तांबोळी याच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयातील सहकारी तत्पर सेवा देत कोरोना बाधीत रुग्णावर उपचार करत आहेत. तर तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा फैलाव होत असल्याने शनिवारी जिल्हापरिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेद्रं क्षिरसागर यानी भेट देऊन कामगिरी बाबत समाधान व्यक्त करत काही सुचना केल्या आहेत.
मागील सव्वा वर्षापासून निमगावजाळी आरोग्य केद्रांअतर्गत येणाऱ्या गावानमध्ये कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी आरोग्य विभाग उपाययोजना राबवत असून बाधीत रुग्ण आढळल्यानतंर त्याच्यावर योग्य ते उपचार करण्यात येत आहेत. तसेच आजपर्यत निमगावजाळी आरोग्य केद्रांअतर्गत ५ हजार दोनशे पेक्षा जास्त नागरीकाना लसीचा पहिला ढोस तर सव्वा दोन हजार नागरीकाना लसीचा दुसरा ढोस देण्यात आला आहे. तर आतापर्यंत ६७५ पेक्षा जास्त कोरोना बाधीत रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहे.
दरम्यान कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शनिवारी जिल्हापरिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेद्रं क्षिरसागर यानी निमगावजाळी आरोग्य केद्रांला भेट देऊन रुग्णाबाबत माहिती घेतली. यावेळी आरोग्य केद्रांच्या कामगिरी बाबत समाधान व्यक्त करत जास्तीत जास्त चाचण्या करुन संशयिताचे विलगीकरण करण्याच्या सुचना करताना गर्दी टाळण्यासाठी गावनिहाय लसीकरण करण्याच्या सुचना त्यानी केल्या आहेत. यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी दहिफळे, गटविकास अधिकारी सुरेश शिदें, तालुका आरोग्य अधिकारी सुरेश घोलप, डॉ. तय्यब ताबोळी, दिपक महाजन, देवेंद्र चद्रशेखर, भाऊसाहेब कानवडे, वैशाली ठुबे, विष्णू गर्जे, भास्कर गिरी, परिचर सविता शिरसाठ आदि उपस्थित होते.
आश्वी खुर्द येथे उभारण्यात आलेल्या विलगीकरण कक्षाला अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी दहिफळे यानी शनिवारी भेट दिली. यावेळी नागरीकानी मांडलेल्या समस्या व तक्रारी ऐकून घेत योग्य त्या कार्यवाहीबाबत तसेच विलगीकरण कक्षातील नागरीकाना योग्य ते औषधउपचार करण्याच्या सुचना आश्वी खुर्द आरोग्य केद्रांला केल्या आहेत.