ओझर खुर्द येथिल जिजाबापू शिंदे यांचे निधन.

संगमनेर Live
0
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील ओझर खुर्द येथिल रहिवासी व सामाजिक तसेच धार्मिक कार्यात अग्रेसर असलेले जिजाबापू राजाराम शिंदे (वय - ६७) यांचे नुकतेच निधन झाले असून गावचे व परिसराचे वैभव हरपल्याची प्रतिक्रिया येथिल नागरीकानमधून व्यक्त होत आहे.

जिजाबापू शिंदे यानी ओझर खुर्द यात्रा कमिटी, ओझर खुर्द देवस्थान ट्रस्ट चे उपाध्यक्ष पद व जनसेवा मंडळाचे उपाध्यक्ष पद भुषवत आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. विखे पाटील कुटुंबाचे जेष्ठ व एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. प. पु. स्वामी गगनगिरी महाराज यांच्यावर त्याची श्रद्धा होती. येथील जगदबा माता मंदिर उभारणीत त्यानी महत्वाचे योगदान दिले होते. सर्वसामान्याच्या सुख दुःखात ते नेहमी सहभागी होत असत. सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रात निस्वार्थ भावनेने काम करणारे मार्गदर्शक काळाच्या पडद्याआड गेल्यामुळे ओझर खुर्द गावची मोठी हानी झाल्याची भावना येथिल नागरीकानमधून व्यक्त होत आहे.

दरम्यान जिजाबापू शिंदे याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, नातंवडे असा मोठा परिवार असून येथील प्रगतशील शेतकरी सोमनाथ शिदें व दिनकर शिदें याचे ते वडील होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !