◻ सहकारमहर्षी थोरात कारखान्याच्या २२ कर्मचार्यांचा सेवापुर्तीनिमित्त सन्मान.
संगमनेर Live | सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने कायम सभासद, ऊस उत्पादक व कामगार यांच्या हिताचे निर्णय घेतले असून या कारखान्यामुळे अनेकांच्या कुटुंबामध्ये समृध्दी आली आहे. अनेक वर्ष सेवा दिल्यानंतर निवृत्त होतांना मिळणारा सन्मान हा प्रत्येकासाठी अनमोल ठेवा असून कारखान्याच्या विकासात सर्व कामगारांचे कायम मोठे योगदान राहिले असल्याचे गौरवौद्गार रायाचे महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी काढले असून २२ कर्मचार्यांचा सेवापुर्ती निमित्त सपत्नीक संत्कार करण्यात आला.
कारखान्याच्या विश्रामगृहावर राज्याचे महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत २२ सेवानिवृत्त कर्मचार्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे, इंद्रजित थोरात, शिवाजीराव थोरात, आर. एम. कातोरे, चंद्रकांत कडलग, इंद्रजित खेमनर, गणपतराव सांगळे, रमेश गुंजाळ, रोहिदास पवार, मिनानाथ वर्पे, अभिजीत ढोले, संपतराव गोडगे, भाऊसाहेब शिंदे, डॉ. तुषार दिघे, माणिकराव यादव, रामदास वाघ, संभाजीराव वाकचौरे, भास्करराव आरोटे, दादासाहेब कुटे, विनोद हासे, अनिल काळे, सौ. मिराताई वर्पे, सौ. मंदाताई वाघ, अमृतवाहिनी बँकचे उपाध्यक्ष दत्तु खुळे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, किरण कानवडे, शंकर ढमक, भाऊसाहेब खर्डे, अॅड. शरद गुंजाळ, केशव दिघे, राजेंद्र कढणे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी नामदार थोरात म्हणाले कि, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी घालून दिलेल्या आदर्श शिस्तीवर कारखान्याची सदैव वाटचाल सुरु आहे. सभासद, ऊस उत्पादक व कामगार या सर्वांच्या हिताचे निर्णय कारखान्याने कायम घेतले आहे. यावर्षी विक्रमी १३ लाख १९ हजार मे. टन ऊसाचे गाळप केले असून कायम तालुक्याच्या विकासात योगदान दिले आहे. कर्मचार्यांच्या जीवनात ही आनंद निर्माण करतांना वेळेत पगार विविध सुविधा, बोनस दिले आहे. येथील प्रत्येकाने हा कारखाना ही संस्था माझे कुटुंब आहे असे समजून काम करतांना मनापासून काम केले आहे. अनेक वर्ष सेवा करतांना सर्वांशी जिव्हाळ्यााचे नाते निर्माण झाले आहे. यापुढे ही आपला हा परिवार एक आहे. हे समजून सर्वांनी विकासाच्या वाटचालीत योगदान द्यावे. प्रत्येकाने आरोग्याची काळजी घ्यावी. या कारखान्यामुळेच अनेक परिवारांतील मुले उच्च शिक्षीत झाले असून अनेक जण परदेशात उच्च पदावर कार्यरत आहे. हे आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद असल्याचे ही ते यावेळी म्हणाले.
आ. डॉ. तांबे म्हणाले कि, नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका हा एक परिवार झाला आहे. नामदार थोरात हे राज्यात महत्वाच्या जबाबदार्या सांभाळत असून ही कुटुंब प्रमुख या नात्याने ते तालुक्यातील प्रत्येक कुटुंबाची काळजी ते घेत आहे. नामदार थोरात यांच्या दुरदृष्टी नेतृत्वामुळे तालुक्यातील विकासाला मोठी गती मिळाली असून आज संगमनेर तालुका हा राज्यात अग्रगण्य तालुका म्हणून ओळखला जात असल्याचे ही ते यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमाचे स्वागत व्हा. चेअरमन संतोष हासे यांनी तर प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले. सुत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांनी आभार मानले.