◻ तरुणांनी पुढाकार घेत गावोगावी कडक लॉगडाऊन राबवा.
संगमनेर Live | लोकसहभाग व प्रशासनाच्या समन्वयातून बोटा व चंदनापुरी येथे झालेले कोवीड केअर सेंटर हे इतरांसाठी आदर्शवत असून कोरोणा किंवा इतर कोणत्याही आजाराचे लक्षणे असले तरी त्या व्यक्तीला तातडीने स्वतंत्र ठेवा . कोरोना ची साखळी तोडण्यासाठी निर्बधांचे कडक पालन करणे गरजेचे असून. प्रत्येक गावात तरुणांनी पुढाकार घेत ग्राम आरोग्य सुरक्षा समिती अधिक कार्यक्षम बनवून गावोगावी लॉकडाऊनचे निर्बध कडक पद्धतीने राबवा असे आवाहन राज्याचे महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी केली असून कोरोना रुग्णांशी आस्थेवाईकपणे संवाद साधून त्यांना धीर दिला.
आज चंदनापुरी, आंबी दुमाला, बोटा येथे कोवीड केअर सेंटरची पाहणी व नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी समवेत आमदार डॉ. सुधीर तांबे, जिल्हापरिषद सदस्य अजय फटांगरे, मिलिंद कानवडे, आर. बी. रहाणे, विजय राहणे, तुळशीनाथ भोर, सुहास आहेर, सुहास वाळुंज, बाळासाहेब ढोले, विकास शेळके, संतोष शेळके यांसह प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे आदी उपस्थित होते.
या भेटीत नामदार बाळासाहेब थोरात यांनी चंदनापूरी व बोटा येथील कोवीड केअर सेंटरमध्ये जाऊन रुग्णांची आस्थेवाईकपणे चौकशी करत त्यांना धीर दिला यावेळी विविध सुविधांची पाहणी केली.
याप्रसंगी गावकर्यांशी संवाद साधताना नामदार थोरात म्हणाले की, कोरोन हे आपल्या सर्वावर संकट आहे. यामध्ये कोणीही निष्काळजीपणा करू नये. कुटुंबातील एका व्यक्तीला कोरोना ची बाधा झाली तर संपूर्ण कुटुंब बाधित होते. म्हणून एका व्यक्तीला लक्षणे आढळली तरी तातडीने त्याचे विलगीकरण करा. प्रत्येक गावात युवकांनी पुढाकार घेत ग्राम आरोग्य सुरक्षा समिती अधिक कार्यक्षम भरून लॉकडाऊनचे निर्बध कडक पद्धतीने पाळा. यासाठी अनुशासित समित्या तयार करा. घुलेवाडी मध्ये याबाबत अत्यंत चांगले काम होऊन त्याचे मॉडेल म्हणून अनुकरण करा. गाव पातळीवर महत्त्वाचे काम हे स्थानिक डॉक्टर अंगणवाडी सेविका आरोग्य सेविका आशा सेविका तलाठी ग्रामसेवक कोतवाल शिक्षक हे अत्यंत चांगले काम करत आहे. त्यांना सर्वांनी घरोघर तपासणीसाठी सहकार्य करा. संगमनेर मधील सर्व प्रशासन व यशोधन कार्यालय आपल्या सेवेसाठी २४ तास कार्यरत आहे. निष्काळजीपणा हाच सध्या मारक ठरतो आहे. ग्रामीण भागात वाढणारी कोरोणाची रुग्ण संख्या ही चिंताजनक असून येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला ही वाढ पूर्ण थांबवायची आहे. यासाठी प्रत्येकाने जागृती ने काम करा. याचबरोबर रुग्णांची चौकशी करत त्यांना धीर दिला. तर चंदनापुरी येथील कोवीड केअर सेंटर हे शिक्षकांनी सुरू केले असून ज्ञानदान करणार्या शिक्षकांनी केलेले हे समाजहिताचे कार्य इतरांसाठी मार्गदर्शक असल्याचे ते म्हणाले.
आमदार डॉ तांबे म्हणाले की, कोरोना ची काळजी हाच कोरोन वरचा उपाय आहे. येत्या काळात सर्वांचे लसीकरण होण्यासाठी नामदार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले जाणार असून गर्दी व घरगुती समारंभ टाळणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच कोणतेही लक्षण आढळल्यास तर तातडीने जवळच्या वैद्यकीय अधिकार्यांचा सल्ला घ्या.
कोवीड केअर सेंटर मधील रुग्णांच्या चेहर्यावर फुले हसू..
या भेटीदरम्यान नामदार थोरात यांनी कोरोणा रुग्णांची केलेली आस्थेवाईकपणे चौकशी. त्यांना मिळणार्या सुविधा व येणार्या समस्या सोडविण्यासाठी केलेल्या सूचना यामुळे अनेक कोरोना रुग्णांना धीर मिळाला असून सर्वांच्या चेहर्यावर हसू फुलले.