◻ अवघ्या ३५ व्या वर्षी तरुण उद्योजकाचे निधन ; आश्वी पंचक्रोशीशी होते अतुट नाते.
संगमनेर Live | मुक्ताई उद्योग समुहाचे सर्वेसर्वा व नारायणगाव (जि. पुणे) ग्रामपंचायतीचे माजी सदंस्य अमित राजेद्रं कोऱ्हाळे (वय - ३५) यांचे नुकतेचं अल्पशा आजाराने निधन झाले आहे. आश्वी खुर्द (ता. संगमनेर) येथिल सेवानिवृत्त ग्रामसेवक हभंप वसंतराव वर्पे याचे अमित कोऱ्हाळे हे जावई होते.
अमित कोऱ्हाळे यानी नारायणगावसह पुणे जिल्हात उद्योजक म्हणून नावलौकिक मिळवला होता. नारायणगाव ग्रामपंचायतयतीचे सदंस्य असताना विविध विकासकामे कामे मार्गी लावण्यात महत्त्वाची भुमिका बजावली होती. पुणे - नाशिक जिल्ह्यात राजकीय, शैक्षणिक व सामाजिक कार्यात त्यानी मोठे योगदान दिले आहे. सर्वसामान्य नागरीकाना मदत करण्यासाठी ते प्रसिद्ध होते. तर गंगासागर अँक्वा व मुरुड जंजिरा येथील थ्री स्टार हॉटेलचे ते मालक होते. विशेषतः कोरोना महामारीत त्यानी तब्बल २५० नागरीकाना महत्वाची मदत केली होती.
त्याच्या अकस्मित निधनामुळे कोऱ्हाळे व वर्पे कुटुबियावर दु:खाचा डोगर कोसळल्यामुळे नातेवाईक, मित्रपरिवार व नागरीकानकडून त्याचे सात्वंन होत आहे. दरम्यान अमित कोऱ्हाळे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, भाऊ, सासू, सासरे व मेव्हणे असा मोठा परिवार असून त्याच्या अकस्मित निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.