◻ पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्यासह सहकाऱ्याचे केले कौतुक.
संगमनेर Live | स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर याच्याकडून नगर जिल्ह्यात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी विशेष उत्कृष्ट कामगिरी केली जात असल्यामुळे पोलीस अधिक्षक मनोज पाटील यानी नुकताचं स्थानिक गुन्हे शाखेचा प्रशस्तिपत्र देऊन सन्मान केला आहे. या प्रशस्तिपत्राचा पोलीस निरीक्षक अनिल कटके यानी स्विकार केला आहे.
पोलीस निरीक्षक अनिल कटके यानी (एलसीबी) सुत्रे हाती घेतल्यानतंर कमी कालावधीत आपल्या सहकार्याच्या मदतीने अनेक गुन्हेगाराच्या मुसक्या आवळत उत्कृष्ट कामगिरी बजावल्यामुळे पोलीस अधिक्षक मनोज पाटील यानी कौतुक केले आहे. याआधी पोलीस निरीक्षक अनिल कटके यानी आश्वी व कोपरगाव पोलीस स्टेशन येथे आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला असल्याने आश्वीसह पंचक्रोशीतून पोलीस निरीक्षक अनिल कटके यांचे अभिनंदन होत आहे.
दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पोलीस खात्यात विशेष महत्त्व आहे. ही शाखा प्रमुख गुन्हेगारी शोधांमध्ये आणि अत्यंत संवेदनशील गुन्हेगारीच्या शोधात बनवलेली आहे. एलसीबीचे कर्मचारी कुठल्याही प्रकारचे गुन्हा उघडकीस आणण्यास स्थानिक पोलीस स्टेशनला मदत करतात. हि शाखा मुख्यत्वे महत्त्वाच्या गुन्हेगारीमध्ये पोलीस ठाण्यांशी समांतर तपासणी करते. गुन्हेगारी आणि गुन्हेगारांच्या निरनिराळ्या प्रकारचे रेकॉर्ड ठेवण्यासाठी या ब्रॅचचे आयोजन केले जाते.