◻ स्थानिक गुन्हे शाखेकडून आरोपी जेरबंद ; पोलीस अधिक्षक मनोज पाटील याची लोणी येथिल पत्रकार परिषदेत माहिती.
संगमनेर Live | राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे येथील शशिकांत श्रीधर चांगले (वय - ६०) व सिंधबाई शशिकांत चांगले (वय- ५०) या दापत्याची डोक्यात फावडे घालून निर्घृण हत्या झाली होती. याबाबत राहाता पोलीस ठाण्यात गुरनं १५९/२०२१ नुसार भादवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या हत्याकांडातील तीन आरोपीना अवघ्या चार दिवसात पोलीसानी अटक केल्याची माहिती पोलीस अधिक्षक मनोज पाटील यानी मंंगळवारी दुपारी लोणी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.
या गुन्ह्यात बेंद्रया उर्फ देवेंद्र दुधकाल्या उर्फ भारत भोसले (वय - २८, रा. पढेगाव, तालुका कोपरगाव), दिलीप विकास भोसले (वय - १९) व आवेल विकास भोसले (वय - २०) दोघे ही रा. जवळके तालुका कोपरगाव) असे अटक करण्यात आलेल्या ३ आरोपींचे नावे असून मायकल चव्हाण व डोंगऱ्या चव्हाण (दोघेही रा. लक्ष्मीनगर, ता. कोपरगाव) हे दोन आरोपी फरार आहेत. आरोपी बेंद्रया उर्फ देवेंद्र दुधकाल्या उर्फ भारत भोसले याच्या विरुद्ध पारनेर पोलीस ठाण्यात दोन जबरी चोरीचे, बेलवंडी पोलीस ठाण्यात दरोडा व फसवणूक तर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात घरफोडी असे चार गुन्हे दाखल असल्याचे पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी यावेळी सांगितले.
राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे गावात दि. २५ जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास शशिकांत चांगले (वय - ६० व सिंधुबाई चांगले (वय - ५०) या वृद्ध दाम्पत्याची डोक्यात फावडे मारून निर्घृण हत्या करण्यात आली होती. याबाबत खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी वरिष्ठांच्या सुचनेनुसार स्वतंत्र पथके तयार करून या गुन्ह्याचा अत्यंत कसोशीने तांत्रिक बाबीच्या अधारे तपास केला. पोलीस निरीक्षक कटके यांना सदर गुन्हा हा बेंद्रया उर्फ देवेंद्र दुधकाल्या उर्फ भारत भोसले याने त्याच्या साथीदारांसह केल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी सापळा लावून पाठलाग करून त्याच्यासह दोघांना पकडण्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला यश आले. आरोपीनी सदरचा गुन्हा आपल्या साथीदारांसह चोरीच्या उद्देशाने केल्याची कबूली दिली असल्याची माहिती पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी यावेळी दिली आहे.
दरम्यान ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक दिपाली काळे, उप आधिक्षक संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके व त्यांच्या पथकातील स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि सोमनाथ दिवटे, पोसई गणेश इंगळे, पोहेकॉ दत्तात्रय हिंगडे, पोहेकॉ विश्वास बेरड, पोना सुनिल चव्हाण, सुरेश माळी, पोना संदीप पवार, पोना शकर चौधरी, पोकॉ संतोष लोढे, विशाल दळवी, सचिन आडबल, दिनेश मोरे, दिपक शिंदे, पोकॉ संदीप चव्हाण, सागर ससाणे, रोहित येमूल, रविन्द्र धुंगासे, रणजित जाधव, जालिंद माने, प्रकाश वाघ, संदीप दरंदले, आकश काळे, कमलेश यरुट, योगेश रातपुते, रोहिदास गवगिरे, मच्छिन्द्र बर्ड, चालक पोहेकॉ अर्जुन बढे, संभाजी कोतकर, बबन बेरड यांच्या पथकाने केली आहे.