संगमनेर Live | भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने मागील वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी सध्या आपल्या परिवारासोबत आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेताना दिसून येत आहे.
माहीला वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला आवडते. त्याचबरोबर सर्वात मोठी आवड अर्थातच छंद म्हणजे नवनव्या गाड्यांचे कलेक्शन करणे. सुट्टीच्या कालावधीत धोनी त्याचा हा छंदही जपत आहे. नुकताच त्याचा एक फोटो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
धोनीचा जो फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, त्यामध्ये तो त्याचा मित्र सीमंत लोहानीसोबत दिसत आहे. या फोटोत धोनी आणि सीमंत एकत्र जेवण करत आहेत. धोनीबरोबर त्याच्या मागे असलेली चकाकणारी नवीकोरी व्हिंटेज कारही दिसून येत आहे.
दरम्यान सोशल मीडियावरील चाहत्यांच्या मतानुसार धोनीने रोल्स रॉयसची एक विंटेज कार खरेदी केली आहे.