◻ चाळीस केशर आंबा रोपासह इतर दहा फळझाडाचे रोपन.
संगमनेर Live | मांचीहिल येथिल उज्ज्वल गोरक्षण केंद्राच्या निसर्गरम्य वातावरणा संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथिल सामाजिक कार्यात सदैव आग्रेसर असलेल्या नवकार ग्रुपच्या सदस्यांनी वृक्षारोपण करत निसर्ग संवर्धनचा संदेश दिला आहे.
कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटे दरम्यान मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक कोरोना बाधीत रुग्णांना आपले जीव गमवावे लागले होते. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारकडून युध्दपातळीवर ऑक्सिजन प्लॅन्ट उभारले जात असले तरी ऑक्सिजन निर्मितीचा सर्वात मोठा स्रोत असलेल्या निसर्ग संवर्धनाकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे मांचीहिल स्थित उज्ज्वल गोरक्षण केंद्राचे उपाध्यक्ष सुमतीलाल गांधी यांच्या प्रेरणेतून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या नवकार ग्रुपने उज्ज्वल गोरक्षण केंद्राच्या निसर्गरम्य परीसरात नुकतेच चाळीस केशर आंबा रोपे लावून निसर्ग संवर्धनाचा संदेश दिला आहे.
यावेळी नवकार ग्रुपच्या सदस्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्याचा संकल्प करत महिमा रातडीया, प्रसन्ना रातडीया, ओम रातडीया, रोशन रातडीया, नमन रातडीया, सिध्दम रातडीया यांच्या वाढदिवसानिमित्त रातडीया परिवाराच्या वतीने शेताच्या कडेला अंजीर, फणस, आंबा, जांभुळ, चिकु या दहा फळ झाडांचे वृक्षारोपण केले आहे.
दरम्यान याप्रसंगी नंदकुमार म्हस्के तसेच नवकार ग्रुपचे अभिजीत गांधी, विनीत गांधी, रोहित भंडारी, मंगेश रासने, समीर गांधी, राजेंद्र भंडारी, प्रशांत गांधी, भगवान बोरा, दिपक बोरा, योगेश रातडीया, मनोज पटवा, अविनाश गांधी, प्रितम गांधी, किरण गांधी, पंकज नाके, नितिन गांधी, योगेश लुंकड, राजेंद्र लुणीया, सागर रातडीया, अमित भंडारी, निलेश चोपडा, निलेश रातडीया, आश्विन मुथ्था, वैभव भंडारी, संतोष भंडारी, गौरव गांधी आदि सदंस्य उपस्थित होते.