◻आ. विखे पाटील याचे प्रतिपादन तर आश्वी व जोर्वे जिल्हा परिषद गटातील ५५० आदिवासी कुटूंबियांना खावटी अनुदान योजने अंतर्गत धान्याच्या किटचे केले वितरण.
संगमनेर Live | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वकांक्षी निर्णयामुळेच गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून देशातील प्रत्येक माणसाला मोफत धान्याची उपलब्धता होवू शकली. ८१ कोटी लोकांना मोफत धान्य देण्याच्या योजनेमुळे केंद्र सरकारची ‘सबका साथ सबका विश्वास’ ही घोषणा सार्थ ठरली असल्याचे प्रतिपादन आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील आश्वी आणि जोर्वे जिल्हा परिषद गटातील ५५० आदिवासी कुटूंबियांना खावटी अनुदान योजने अंतर्गत धान्याच्या किटचे वितरण आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. आदिवासी प्रकल्प आधिकारी संतोष ठुबे, जिल्हा परिषद सदस्या अँड. रोहिणी निघुते, दिनेश बर्डे, पंचायत समिती सदस्य गुलाबराव सांगळे, सौ. दिपाली डेंगळे, प्रवरा बॅकेचे चेअरमन अशोक म्हसे, कारखान्याचे संचालक रामभाऊ भूसाळ, डॉ. दिनकर गायकवाड, आण्णासाहेब म्हस्के, एकनाथ नागरे, ज्ञानदेव वर्पे, रखमाजी खेमनर, माऊली वर्पे, गौतम जगताप, मंगेश वर्षे, सरपंच संदिप घुगे, सरपंच म्हाळू गायकवाड, अमोल जोधळे, सतिश जोशी, सचिन गायकवाड, उपसरपंच गोकूळ दिघे आदि याप्रसंगी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना आ. विखे पाटील म्हणाले की, शिर्डी विधानसभा मतदार संघात आदिवासी बांधवांकरीता योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होत आहे. मागील दोन वर्षात संपूर्ण देश कोव्हीड संकटाचा सामना करीत आहे. अशा परिस्थितीत शासन व्यवस्था म्हणून योजनांच्या माध्यमातून दिलासा देण्याचे मोठे काम पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या माधमातून होत आहे. याचा परिणाम गावागावात धान्य उपलब्ध होतयं. देशातील प्रत्येक गरीब नागरीकाला दिवाळी पर्यंत मोफत धान्य योजनेचा मोठा लाभ आत्मनिर्भर पॅकेजच्या माध्यमातून धान्य उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले.
लोणी येथील आदिवासी बांधवांकरीता कार्यान्वित झालेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घरकुल प्रकल्पाचा उल्लेख करुन, आ. विखे पाटील म्हणाले की, यासारखी घरकुल योजना प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या गावात राबविली तर गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या समाज घटकांना घरांची उपलब्धता होवू शकेल. आज मोठ्या प्रमाणात घरकुल योजना प्रलंबित आहेत, ज्या पध्दतीने या योजनांची कार्यवाही होणे अपेक्षीत आहे तसे होत नाही त्यामूळे घरकुल योजनांकरीता आदिवासी प्रकल्प विभागाने घरकुल योजनेच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
देशातील प्रत्येक नागरीकाला मोफत लस देण्याचा निर्णयही पंतप्रधान मोदींनी घेतला. केवळ आश्वासन दिले नाही तर, कृती करुन दाखविली. यामुळेच देशातील ४३ कोटी आणि राज्यातील ४ कोटी नागरीकांचे लसीकरण पूर्ण होवू शकले. शिर्डी विधानसभा मतदार संघातही १ लाख १६ हजार नागरीकांचे लसीकरण यशस्वीपणे पूर्ण झाल्याचे आ. विखे पाटील यांनी सांगितले.
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मराठा, ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांकरीता यावर्षी ५० टक्के शैक्षणिक फी माफ करण्याचा निर्णय घेतला असून, याचाही मोठा दिलासा या परिस्थितीत विद्यार्थी आणि पालकांना मिळेल असे सांगून आ. विखे पाटील म्हणाले की, समाजासाठी कार्यकर्त्यांनी काम करीत राहावे. काही लोकांना योजना आणि माणसं पळविण्याची सवय असते त्यांच्याकडे लक्ष देवू नका असा सल्ला त्यांनी आपल्या भाषणातून दिला.
याप्रसंगी बाळासाहेब मांढरे, भगवानराव इलग, विनायकराव बालोटे, विजयराव चतूरे, जेऊरभाई शेख, भागवतराव उंबरकर, दिलीपराव इंगळे, शिवाजीराव कोल्हे, नानासाहेब दिघे, बाळासाहेब ठोसर, अर्जुन हळनोर, निसार शेख, कनोलीचे सरंपच भाऊसाहेब पवार, उपसरपंच राधाकिसन काकड आदिंसह आदिवासी कुटुंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.