संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील चिंचपुर येथिल सामाजिक व धार्मिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सुलोचना सिताराम थेटे (वय- ७४) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले आहे.
दिवगंत सुलोचना थेटे याच्या पश्चात तीन मुले, सुना, दोन मुली, जावई, पुतणे, नातंवडे असा मोठा परिवार असून त्याच्या निधनामुळे चिचंपूर परिसरावर शोककळा पसरली आहे. थेटे याची निधनवार्ता कळताचं पंचक्रोशीतील राजकीय, सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरानी शोकभावना व्यक्त करत श्रध्दांजली अर्पण केली आहे.
दरम्यान चिंचपुर गावचे पोलिस पाटील व पोलिस पाटील संघटना संगमनेरचे तालुकाध्यक्ष अशोकराव थेटे, प्रगतशील शेतकरी भिमराज थेटे व सुभाष थेटे यांच्या त्या मातोश्री होत्या. तसेच चिंचपुरचे माजी सरपंच दिवगंत सिताराम थेटे याच्या त्या पत्नी होत्या. तर तरुण सामाजिक कार्यकर्ते हर्षल थेटे यांच्या त्या आजी होत.