लोकांसाठी काम व प्रश्नांसाठी संघर्ष करणाऱ्यांच्या पाठीशी जनता उभी राहाते - डॉ. सुजय विखे

संगमनेर Live
0
◻ आगामी संगमनेर नगरपालिका तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीसाठी कार्यकर्त्याना कानमंत्र.

संगमनेर Live | आपल्या गावात गणात आणि प्रभागात प्रत्येक नागरीकाचे लसीकरण झाले की नाही याची माहीती घेण्यासाठी संपर्क अभियान सुरू करा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने उपलब्ध करून दिलेल्या योजनांचा संदेशही घरघरात पोहचवा असे आवाहन खा. डॉ सुजय विखे पाटील यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला.

संगमनेर तालुक्यातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी खा. डॉ. सुजय विखे यांनी विश्रामगृहावर संवाद साधला. जेष्ठ भाजपा कार्यकर्ते भाजयुमो पदाधिकारी यांच्या स्वतंत्र बैठका घेवून त्यांनी आगामी नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीचा कानमंत्र दिला. हेवेदावे आरोप-प्रत्यारोप विसरून पक्ष संघटनेत मेहनत घेवून जनतेपर्यत पोहचलेल्या कार्यकर्त्यांचे मूल्यमापन उमेदवारी देताना होईल असे स्पष्ट संकेत त्यांनी देवून टाकले. 

यावेळी भाजपाचे तालुका अध्यक्ष डॉ अशोक इथापे, रखमाजी खेमनर, डॉ. सोमनाथ कानवडे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्रीराज डेरे, उपाध्यक्ष जावेद जहागिरदार, नगरसेविका सौ. मेघा भगत, व्यापारी आघाडीचे शिरीष मुळे, काशिनाथ पावसे, अमोल खताळ, संघटक योगिराजसिंग परदेशी, शैलेश फटांगरे, दिपेश ताटकर, राहुल भोईर, वैभव लांडगे, अँड. दिपक थोरात, नानासाहेब दिघे, केशव दवंगे, अँड. संदीप जगनर, संदीप घुगे, गोकूळ लांडगे, अविनाश तळेकर, कोंडाजी कडनर, साहेबराव वलवे, संदीप देशमुख यांसह तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी तसेच युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी झालेल्या बैठकीत बोलताना खा. सुजय विखे पाटील यांनी थेट आगामी निवडणुकांचा उल्लेख केला. या निवडणुकांना सामोरे जायचे असेल तर संघटन मजबूत झाले पाहीजे. पक्षाच्या माध्यमातून सुरू असलेले काम जनतेपर्यत पोहचवावे लागेल. निवडणुका आल्या तरच जनतेकडे जायचे हे दिवस आता संपले आहेत. लोकांसाठी काम आणि प्रश्नांसाठी संघर्ष करणाऱ्यांच्या पाठीशी जनता उभी राहाते हा विचार मनात ठेवून आपले गाव गण आणि बुथ सक्षम करण्याबाबत त्यांनी सूचित केले.

स्थानिक पातळीवरच्या आरोप प्रत्यारोपांमध्ये वेळ घालवू नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू असलेले काम लोकांना सांगण्यासाठी पुरेसे आहे. देशात मोदीजींमुळे सर्व नागरिकांना मोफत लस मिळाली. लाभार्थींना दिवाळी पर्यत मोफत धान्य मिळाले. या सर्वाचा आढावा कार्यकर्ते पदाधिकारी यांनी प्रत्येक कुटुंबात जावून घेतला तरी पक्षाचे जनसंपर्क अभियान होवू शकेल. केंद्र सरकार राबवित असलेल्या योजनांचा प्रसार आणि प्रचार हाच आपल्या सर्वाचा अजेंडा असेल. स्थानिक प्रश्नाबाबत लवकरच एक पुस्तिका काढून अपयश दाखवून देणार असल्याचे डॉ. विखे पाटील म्हणाले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !