◻ आ. राधाकृष्ण विखे पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.
संगमनेर Live | दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची तातडीने अंमलबजावणी करून पाच रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने वर्ग करा आशी मागणी भाजप नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे.
राज्यात यापुर्वी दूध उत्पादकांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन केली. मागील अर्थसंकल्पिय अधिवेशनात यासंदर्भात पाच रुपये अनुदानाच्या संदर्भात चौकशी करण्याची मागणी करूनही याची दखल न घेतल्यानेच राज्यात दूध उत्पादक शेतकरी पुन्हा आक्रमक झाले असल्याचे विखे पाटील यांनी पत्रात नमूद केले.
कोव्हीड संकटाच्या दुसऱ्या लाटेत पुन्हा लागू करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे खासगी आणि सहकारी दूध संघांनी दर १०ते १५ रुपयांनी कमी केले. या पार्श्व दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय मागणीसाठी आंदोलन झाल्यानंतर सरकारने २१ जून रोजी बैठक घेवून दूधाला प्रतिलिटर ३५ रूपये भाव देण्याचे मान्य केले. या व्यतिरीक्त पाच रुपये अनुदान. शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावे, खासगी व सहकरी दूध संघाना लागू होईल असा लूटमार विरोधी कायदा करावा, एक राज्य एक ब्रँड धोरण स्विकारावे, भेसळ प्रतिबंधक कायद्याची कडक अंमलबजावणी करून ग्राहकांना शुध्द आणि रास्त भावात दूध उपलब्ध होण्याची कायदेशीर हमी द्यावी.
आशा केलेल्या मागण्यांबाबतही सरकारकडून कोणतीच कार्यवाही होत नसल्याने, आपण योग्य दखल घेवून दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा आशी आग्रही मागणी आ. विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्याकडे अधिवेशनाच्या निमित्ताने केली आहे.