आश्वीचे पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांची अर्थिक गुन्हे शाखेत बदली.

संगमनेर Live
0

◻ आश्वीत पोलीस निरीक्षक सुभाष भोये यानी दाखल होऊन पदभार स्विकारला.

संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांची अर्थिक गुन्हे शाखा अहमदनगर येथे बदली झाली असून आश्वीला राहाता पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेेेले पोलीस निरीक्षक सुभाष भोये हे नव्याने दाखल झाले असून त्यानी पदभार स्विकारला आहे.

नुकतीच आश्वी पोलीस स्टेशन हद्दीतील ३३ गावापैकी महत्वाची व मोठी लोकसंख्या असलेली ९ गावे संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला जोडली गेल्याचे आदेश आले असताना पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांची नगर येथे तर सहाय्यक पोलीस निरीक्षक नयन पाटील यांची जळगाव जिल्ह्यात बदली झाली आहे. मागील दीड वर्षातील कोरोना काळात पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यानी महत्वाची भूमिका बजावत अवैध धंद्यासह गुन्हेगारीवर ही अकुंश निर्माण केला होता. 

आश्वी पोलीस ठाणे हे शिर्डी मतदार संघात तर संगमनेर तालुक्यात येत असल्याने येथे नव्याने दाखल होणारे पोलीस निरीक्षक सुभाष भोये याना ना. बाळासाहेब थोरात व माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील या दोन दिग्गज नेत्याशी समन्वय साधताना मोठी कसरत करावी लागणार आहे. तसेच प्रवरा नदी पट्यातील गावे कार्यक्षेत्र असल्यामुळे बेसुमार अवैध वाळू उपशाबरोबरचं दारु, मटका, गांजासह आमली पदार्थ तस्कंरी आदि अवैध धंद्याना वेसण घालणे व पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याना शिस्त लावण्याचे मोठे आवाहन पोलीस निरीक्षक सुभाष भोये याच्यापुढे असणार आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक पद रिक्त राहणार.?

आश्वी येथे पोलीस निरीक्षक दाखल झाले असले तरी आश्वी हद्दीतील ९ गावे संगमनेरला जोडली गेल्यामुळे आश्वीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पद रिक्त राहण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !