चिचंपूर येथिल ग्रामपंचायत सदंस्य राहुल तांबे यांचे निधन.

संगमनेर Live
0
ना. बाळासाहेब थोरात यांचा खंदा शिलेदार काळाच्या पडद्याआड.

संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील चिचंपूर ग्रामपंचायतीचे विद्यमान सदंस्य व चिचंपूर ग्रामपंचायतीत परिवर्तन घडवून आणण्यात महत्वाची भुमिका बजावणारे राहुल राधाकिसन तांबे (वय- २९) याचे अल्पशा आजाराने निधन झाले असून महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात, नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे व नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे याच्यासह ग्रामस्थानी शोक भावना व्यक्त केल्या आहेत.

नुकत्याचं झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत आपल्या सर्व सहकाऱ्याच्या मदतीने केलेले उत्कृष्ट नियोजन व शेवटच्या माणसापर्यत आपली भुमिका व्यवस्थित पोहचवल्यामुळे चिचंपूर ग्रामपंचायतीत थोरात गटाकडे सत्ता खेचून आणण्यात महत्त्वाची भुमिका राहुल तांबे यानी बजावली होती.त्यामुळे राहुल तांबे याचे महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी कौतुक केले होते. तालुक्यातील कॉग्रेसच्या मोठ्या पदावर काम करण्याची संधी ही तांबेना मिळणार होती. मात्र नियतीने त्याची ती संधी हिरावून घेतली आहे. 

राहुल तांबे हे हसतमुख व प्रेमळ स्वभावामुळे सर्वाना परिचित होते. महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली यशोधन कार्यालयातून अतिशय तळमळीने गोर-गरीब जनतेची काम करुन आणण्यात त्याचा हातखंड होता. गावात विविध विकास कामे करण्यात त्याची दुरदृष्टी वाखण्यासारखी होती. निस्वार्थ भावनेतून गावच्या विकासासाठी झटणारा कॉग्रेचा सच्चा शिलेदार तसेच गोर - गरीब जनतेने आपला आधार गमावल्याची शोकाकूल प्रतिक्रिया ग्रामस्थानी व्यक्त केली आहे.

दरम्यान राहुल तांबे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई, वडील, एक भाऊ, भावजय व एक बहीण असा मोठा परिवार असून येथिल प्रगतशील शेतकरी राधाकिसन तांबे यांचा राहुल हा मुलगा तर डॉ. चद्रंकात तांबे यांचा पुतण्या होत. राहुल च्या अकस्मित निधनामुळे चिचंपूरसह पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !