संगमनेर Live (नगर) | विकासाचे राजकारण करणे ही माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांचीच प्रेरणा घेऊन आपण खासदार म्हणून विकासकामे मार्गी लावली असून वैचारीकता ठेऊनच विकासाला पाठबळ देणाऱ्यांना बरोबर घेऊन आपण सर्व सामान्य जनतेला न्याय देण्याची भूमिका घेतली असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे.
कुरुंद (ता. पारनेर) येथे लसीकरण अभियानास भेट देऊन गाव तिथे लसीकरण करण्याच्या तसेच आरोग्य कर्मचारी यांच्या अडीअडणी समजून घेतल्या, जास्तीत जास्त लसीकरण करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानास भेट देऊन स्वस्त धान्य दुकानदारास वाटपा संदेर्भात योग्य त्या सूचना देऊन लाभार्थ्यांना धान्यचे वाटप करुन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधला.
राष्ट्रीय महामार्ग विकास योजनेअंतर्गत राष्ट्रीय महामार्ग ७६१ राळेगण थेरपाळ ते गव्हाणवाडी १० किलोमीटर रस्ता रुंदीकरण व मजबूतीकरण रस्त्याचा भुमिपुजन कार्यक्रम खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते व जिल्हा परिषद सदस्या सुप्रियाताई झावरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दि. २१ रोजी करण्यात आले. १६ कोटी २० लाख रुपयांचा निधी यासाठी उपलब्ध झाला आहे.
यावेळी सभापती गणेश शेळके, राहुल शिंदे, भाजपचे तालुका अध्यक्ष वसंतराव चेडे, माजी तालुका अध्यक्ष विश्वनाथ कोरडे, संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ, युवासेनेचे तालुका प्रमुख नितीन शेळके, कुरूंदचे सरपंच गणेश मधे, उपसरपंच नंदा कारखिले, शिवाजीराव सालके, म्हसे सरपंच प्रविण उदमले, राळेगण थेरपाळचे सरपंच पंकज कारखिले, पारनेर तालुका पत्रकार संघाचे मार्गदर्शक दत्ता उनवणे, निघोजचे उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे, मंगेश लाळगे, निलेश घोडे, अस्लमभाई इनामदार, नानभाऊ पठारे, संदीप सालके, भारत शितोळे, डॉ. साहेबराव पानगे, शिरूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते, समन्वयक पोपटराव पाचंगे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासदार डॉ. विखे पाटील यावेळी म्हणाले, १६ कोटी वीस लाख रुपयांचा हा रस्ता पुर्णपणे उकरुन तयार केला जाणार आहे. केंद्र सरकारने रस्त्यासाठी मोठा निधी दिला आहे. नगरचा बायपास रस्ता एक हजार कोटीचा आहे. कामाची गुणप्रत कशी आहे, याची चर्चा होत असली तरी रस्ता चांगला झाला पाहिजे. यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करीत आहे. महाविकास आघाडी राज्यात असली तरी तालुक्यात नाही. आज शिवसेनेचे नेते व्यासपीठावर आहेत. आमची वैचारिकता आहे म्हणून आम्ही एकत्र आहे. लसिकरण करताना गावात जाऊन लसिकरण केले पाहिजे. ही प्रक्रिया केंद्र सरकारने सुरू केली आहे.
अमेरिकेत एक लस बारा हजार रूपयांना घ्यावी लागते ही तेथील परस्थीती आहे. लसिकरणासाठी ३५ हजार कोटी रुपये केंद्रसरकार खर्च करणार आहे. भविष्य काळात लसिकरण वाढणार आहे. धान्य सरकार मोफत देत आहे. अनेक सुविधा केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू आहेत. २०२२ पर्यंत प्रत्येक गरिबाला घर मिळेल अशी योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या योजना मोठ्या प्रमाणात कार्यान्वित होऊन राज्याचा व जिल्ह्याचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे. यावेळी सभापती गणेश शेळके, जिल्हा परिषद सदस्या सुप्रियाताई झावरे पाटील आदिंची भाषणे झाली.
आयुष्यमान आरोग्य योजना माध्यमातून विळद घाटातील विखे पाटील हॉस्पिटलमध्ये उपचार मोफत होत असून त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेने घेण्याचे आवाहन खासदार डॉ. विखे पाटील यांनी केले आहे.