संगमनेर तालुक्यात कोरोनाचा कहर सुरुचं.. तब्बल १९७ बाधीत रुग्ण आढळले.

संगमनेर Live
0
◻ सोमवारी आश्वीसह परिसरातील गावाना दणका.

संगमनेर Live | संगमनेर तालुक्यात सोमवारी (दि. ३० ऑगस्ट २०२१) तब्बल १९७ कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले असून आश्वी परिसरातील १४ गावानमध्ये पुन्हा ४० बाधीत रुग्ण आढळून आल्यामुळे आश्वीसह परिसरातील गावाना कोरोनाने पुन्हा दणका दिला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस वाढणाऱ्या संसर्गामुळे नागरीकानी खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

सोमवारी संगमनेरच्या शहरी भागात २८, उंबरी बाळापूर येथे ४, आश्वी बुद्रुक येथे १, आश्वी खुर्द येथे १, प्रतापपूर येथे १, निमगावजाळी येथे ४, मनोली येथे २, खळी येथे १, पिप्रीं येथे ३, चिचंपूर येथे २, झरेकाठी येथे ३, कनोली येथे १, मालुंजे येथे २, रहिमपूर येथे २, ओझर खुर्द येथे १३, जोर्वे येथे २, कोकणगाव येथे २, खांबे येथे २, खरशिंदे येथे १, दरेवाडी येथे १, वरंवडी येथे १, हिवरगाव पठार येथे १, ढोलेवाडी येथे १, चिकणी येथे ३, मिर्झापूर येथे १, वरझडी येथे २, सायंखिडी येथे १, जवळे बाळेश्वर येथे १, पिपळगाव माथा येथे १, तळेगाव दिघे येथे १, कसार दुमला येथे २, वडगाव लांडगा येथे २, जवळे कडलग येथे २, केळेवाडी येथे १, अकलापूर येथे २, 

चंदनापूरी येथे २, समनापूर येथे २, वडझरी बुद्रुक येथे १, कौठे कमळेश्वर येथे १, निळंवडे येथे १, पारेगाव खुर्द येथे १, पारेगाव बुद्रुक येथे ५, राजापूर येथे १, करुले येथे १, नादूंर खंदारमाळ येथे १, घुलेवाडी येथे ३, खांडगाव येथे १, जाखुरी येथे २, पारेगाव येथे ३, पेमगिरी येथे १, कौठै खुर्द येथे १, पिपंरणे येथे ३, रायते येथे १, मालदाड येथे २, पिपळगाव कोझिंरा येथे १, गुंजाळवाडी येथे ७, खराडी येथे २, मेढंवन येथे ४, पोखरी हवेली येथे १, निमज येथे २, कोल्हेवाडी येथे २, पळसखेडे येथे १, चिखली येथे ४, हिवरगाव पावसा येथे ३, काकडवाडी येथे १, निमोण येथे २, धादंरफळ येथे २, बिरेवाडी येथे ८, रंणखाब येथे ४,कौठे मलकापूर येथे १, शेडेवाडी येथे १, साकूर येथे ४, जाभुंळवाडी येथे १ व मिर्झापूर येथे १ असे कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत.

दरम्यान आश्वी परिसरातील उंबरी बाळापूर, आश्वी बुद्रुक, आश्वी खुर्द, प्रतापपूर, चिचंपूर, झरेकाठी, रहिमपूर, पिप्रीं, कनोली आदि १४ गावामध्ये बाधीत ४० रुग्ण आढळल्यामुळे नागरीकानी सोशल डिस्टंसिगंचे पालन करताना मास्क घालने बंधनकारक असून नागरीकानी योग्य ती काळजी घेऊन स्वता:चे व कुटुंबाचे संरक्षण करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !