पारेनर तालुक्यात दुचाकी चोरी करणारा संगमनेर तालुक्यातील आरोपी जेरबंद.

संगमनेर Live
0
◻ स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

संगमनेर Live | पारनेर तालुक्यातून दुचाकी चोरी करणाऱ्या संगमनेर तालुक्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यानी मुद्देमालासह अटक केली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, २५ ऑगस्ट २०२१ रोजी महेश चंद्रकांत थोरात (वय- ३२, रा. लोणी रोड, पारनेर) हे त्यांचे मित्राची बजाज कंपणीची सीटी - १०० मॉडेल मोटार सायकल नं. एमएच - १६ - बीक्यू - ०२१७ ही घेवून वासूदे (ता. पारनेर) येथे गेले होते. वासूदे गावातील किराणा दुकाणासमोर मोटार सायकल उभी करुन थोरात हे दुकाणामध्ये गेले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांची मोटार सायकल चोरुन नेली होती. त्याबाबत पारनेर पो. स्टे. येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. 

हा गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके याच्यां मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना पो. नि. कटके यांना गुप्त बातमीदारांकडून दुचाकी चोरीचा गुन्हा हा साईनाथ माळी (रा. कोंची, ता. संगमनेर) याने केला असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि. गणेश इंगळे, पो. हे. कॉ. दत्तात्रय हिंगडे, पो. ना. विशाल दळवी, शंकर चौधरी, पो. कॉ. मयूर गायकवाड, रोहिदास नवगिरे, चालक पो. हे. कॉ. चंद्रकांत कुसळकर यानी संगमनेर येथिल आरोपी साईनाथ मुरलीधर माळी (रा. कोंची, ता. संगमनेर) याला कर्जूले हर्या (ता. पारनेर) येथून ताब्यात घेतले. 

आरोपीकडे गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागल्यामुळे त्याची कसून चौकशी केल्यानतंर त्याने गुन्हा केल्याची माहिती दिली. पोलिसांनी गुन्ह्यात चोरलेली २० हजार रुपये किंमतीची गाडी जप्त करुन आरोपीला मुद्देमालासह पारनेर पो. स्टे. येथे हजर केले असून पुढील तपास पारनेर पोलीस करत आहे.

दरम्यान ही कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस अधिकारी व अमलदार यांनी केली आहे.

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !