संगमनेर मध्ये आरटीओ कार्यालयासाठी नामदार थोरात यांची परिवहन मंत्री यांच्या समवेत बैठक.

संगमनेर Live
0

परिवहन मंत्री ना. अनिल परब यानी दिल्या आरटीओ कार्यालय सुरू करणे बाबत सूचना.

संगमनेर Live | संगमनेर हे अहमदनगर जिल्ह्यातील मध्यवर्ती व मोठे ठिकाण आहे. तसेच संगमनेर तालुक्यामध्ये वाहनांची संख्याही सर्वाधिक असून अकोले - राजूर या परिसरातून व संगमनेर तालुक्यातून आरटीओ कार्यालयाच्या कामकाजासाठी श्रीरामपूर हे दूरवर पडते. म्हणून संगमनेर या ठिकाणी नव्याने आरटीओ कार्यालय सुरू करणे बाबत राज्याचे महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी पुढाकार घेतला असून याबाबत लवकर प्रस्ताव सादर होणार आहे.

मुंबई मंत्रालय येथे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या कार्यालयात संगमनेर मध्ये आरटीओ कार्यालय सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत बैठक संपन्न झाली. यावेळी महाराष्ट्राचे परिवहन मंत्री नामदार अनिल परब, परिवहन आयुक्त अविनाश ढोकणे आदी उपस्थित होते.

सध्या संगमनेरसाठी श्रीरामपूर येथे आरटीओ कार्यालय आहे. परंतु संगमनेर - अकोले येथील नागरिकांना हे अंतर जास्त होत आहे. संगमनेर मध्ये वाहनांची संख्या सर्वाधिक आहे तर मोटर सायकल मध्ये संगमनेरचा हा राज्यात प्रथम क्रमांक लागतो आहे. संगमनेर मध्येच परिवहन कार्यालय निर्माण व्हावे यासाठी नामदार बाळासाहेब थोरात यांनी पुढाकार घेतला असून नव्याने आरटीओ कार्यालय व वाहन तपासणी ट्रेकसाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यात येईल असे नामदार थोरात यांनी सांगितले. यावर तातडीने प्रस्ताव सादर करुन संगमनेर मध्ये लवकरच आरटीओ कार्यालय सुरू करणे बाबत परिवहन मंत्र्यांनी संबंधित विभागाला सूचना दिले आहे. तोपर्यंत दर आठवड्यात संगमनेर येथे विशेष शिबिर आयोजित करण्याचे आदेशही परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.

नामदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्याला संगमनेर मध्ये अद्यावत असे उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालय, नगर पालिका इमारत, नव्याने उभी राहिलेली अद्यावत न्यायालय इमारत, पंचायत समिती इमारत, कवी अनंत फंदी खुले नाट्यगृह, क्रीडासंकुल, बायपास यांसह महाराष्ट्रात सर्वात लक्षवेधी आकर्षण ठरणारे बस स्थानक यांचा समावेश आहे आता नव्याने होणारे आरटीओ कार्यालय यामुळे संगमनेरच्या वैभवात आणखी भर पडणार आहे. या निर्णयामुळे संगमनेर तालुक्यातील वाहनधारकांमध्ये मोठे उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !