नगर दक्षिणेचे लोकप्रिय खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील यांचा आज वाढदिवस. डॉ. सुजय रा. विखे पाटील हे नगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते दिवगंत मा. खासदार पद्मभुषण बाळासाहेब विखे पाटील यांचे नातु तसेच माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील याचे सुपुत्र आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत नको त्या घडामोडी घडल्यानतंर भाजपकडून उमेदारी स्विकारुन मी - मी म्हणाऱ्या पैलवानाना आसमान दाखवणाऱ्या आमच्या लाडक्या खासदार डॉ. सुजयदादाचा आज वाढदिवस आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ते संसदेत गेले. नम्रता व संयमीपणा हा गुण त्याच्याकडे असलातरी लोकहितासाठी वेळोवेळी घेतलेल्या आक्रमक भुमिकेने त्याना राजकारणातील डॉक्टर ही पदवी बहाल झाली आहे. दिवगंत खा. बाळासाहेब विखे पाटील यांचा वारसा खऱ्या आर्थाने ते चालवत असल्याची भावना ही जनमासातून व्यक्त होणे ही त्याच्या कामाची पोहच पावती असून लोकसभेतील सर्वात तरुण व अभ्यासू खासदार म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह व सहकार मंत्री अमित शहा तसेच नितिन गडकरी यांच्याबरोबर पंकजाताई मुंडे यानी सदैव त्याची कौतुकाने पाठ थोपाटली आहे.
विखे कुटुंबाने जिल्ह्यातील २०८ आत्महत्याग्रस्त कुटुंबाना दत्तक घेऊन विविध योजनाच्या माध्यमातून अर्थसाह्य असेल, मुलीची लग्न असेल आदिसह शासनाच्या विविध योजना कोणताही भेदभाव न करता जनसेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यत पोहचवण्याचे काम आजही अविरत पणे सुरु असण्यामागे डॉ. विखे याचे परिश्रम आहेत.
विक्रमी मताधिक्याने २०१९ ला खासदार म्हणून निवडून आल्यानतंर मतदार संघातील विकासाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी सदैव प्रयत्नशील असलेल्या सुजयदादा के. के. रेज व कुकडी चारीचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी सर्वोत्तोपरी पर्यत्न करत आहेत. नगर जिल्ह्यातील विविध रस्त्याच्या कामासाठी हजारो कोटीचा निधी आणून प्रत्यक्ष कामाला सुरवात करणारा इतिहासातील पहिला खासदार असल्याचे त्यामुळे जनसामान्यातून बोलले जात आहे. तर अहमदनगर दक्षिण व शहरात राजकारणाच्या श्रेयवादातून बंद पडलेले विविध विकास प्रकल्प व योजना मार्गी लावल्याचे श्रेय आता डॉ. सुजय विखे याना जनताचं देऊ लागल्याने अनेकाच्या पायाखालची माती सरकू लागल्याने त्याची जनतेच्या मनातील खासदार ही ओळख आधोरेखित झाली आहे.
सहकाराची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विखे पाटील कारखान्याचे चेअरमन असताना जिल्ह्यातील मोडकळीस आलेले गणेश व राहुरी येथिल साखर कारखाने शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून या दोन्ही कारखान्याना उर्जित अवस्थेत आणण्याचे मोठे काम डॉ. विखे पाटील यानी केल्यामुळे येथिल अर्थकारणाला मोठी गती मिळाली असून शेतकऱ्याच्या मालाला योग्य बाजारभाव मिळत असल्याने शेतकऱ्यासह व्यापारी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.
जागतिक कोरोना संकटातही विखे पाटील कुटुंबाने शिर्डी मतदार संघ व नगर जिल्ह्यातील जनतेला वाऱ्यावर सोडले नाही. याकाळात खा. डॉ. विखे यानी स्वतः कोरोना बाधीत रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी आवश्यक असलेले रेमेडिसिवीर इंजेक्शन उपलब्ध करुन दिले. तसेच ऑक्सिजन प्लांट व मोफत कोविड सेटंर उभारुन जनतेला आधार दिला.
‘ लॉकडाऊन ’ काळात एकही गरीब उपाशी राहू नये यासाठी जिल्हातील गरीब जनतेला अन्नधान्य व किराणा किटचे वाटप केले. तसेच विविध ठिकाणी स्वयपाकगृह उभारत कार्यकर्ते व जनसेवकाच्या मदतीने लोकाना अन्न पाकीटाचे वाटप करुन लोकप्रतिनिधी हा केवळ भाषण ठोकणारा नव्हे तर जनतेच्या वेळप्रसंगी मदतीसाठी झटणारा हवा हे सिध्द करुन दाखवल्यामुळे लहानापासून आबालवृद्धानाही त्याच्याबरोबर सेल्फी काढण्याचा मोह आवरता येत नाही.
तेजस्वी वकृत्व, ओजस्वी नेतृत्व, धडाडीची कार्यपध्दती, दुरदृष्टी व संघटन कौशल्य या गुणाची खान असलेले, सर्वसामान्यांना सहज भेटणारा नेता व आदर्श जीवनशैली सहजपणे सांभाळणारा खासदार म्हणूनही ख्याती असलेल्या आमच्या लाडक्या खासदार डॉ. सुजयदादा राधाकृष्ण विखे पाटील याना वाढदिवसांच्या हार्दिकं शुभेच्छां.!
सदैव आपलाचं
अँड. अनिल सावळेराम भोसले पाटील
मा. उपसरपंच आश्वी खुर्द तथा मा. संचालक पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना प्रवरानगर